सावरवाडी (प्रतिनिधी) : तीन वर्षापूर्वी शासकीय निधी मंजूर होऊन करवीर तालुका पश्चिम भागातील बहिरेश्वर ते धनगरवाडा या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम थंडावले आहे. या रस्त्याची चाळण झाली आहे. डांबरीकरण होणार कधी, असा सवाल करीत त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला. 

मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. म्हारुळ,  आमशी, बीडशेड, बहिरेश्वर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डेच पडले आहेत. दुतर्फा गारवेली वाढलेल्या आहेत. त्यामुळेच या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाच्या मागणीसाठी परिसरातील हजारो कार्यकर्त रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.