अंबपवाडी ते मनपाडळे रस्त्याची दुरावस्था…

0
172

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी ते मनपाडळे रस्त्यावरील खड्डे वाहनचालक तसेच प्रवाशांना धोकादायक ठरत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

अंबपवाडी ते मनपाडळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा रस्ता मनपाडळेहून पुढे वारणा-कोडोलीकडे जातो. या परिसरातील कामगार शिरोली एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी, शेतीची वाहतुकी मोठ्या प्रमाणात होते. यावेळी या खड्ड्यांतून जाताना वाहनांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.