कळे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी आज सकाळी (शनिवारी) पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथे विद्यामंदिरमार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली.

रॅलीत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतला होता. या रॅलीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. सावर्डे येथे गावातील चौकाचौकात, गल्ली निहाय झांज-मृदंगाच्या गजरात हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये मुख्याध्यापक डी. बी. पाटील, शिक्षक आदी सहभागी झाले होते.