कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महापालिकेने सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सिध्दाळा गार्डन (प्रभाग क्र.४६) परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने आज (सोमवार) जनजागृती रॅली काढण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती रॅलीस सुरुवात करण्यात आली. पुढे सिध्दाळा गार्डन, कोळेकर तिकटीमार्गे पुन्हा नंगीवली चौकात ही रॅली आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घेण्याचे आवाहन या रॅलीव्दारे करण्यात आले.

या रॅलीत महापालिकेचे विभागीय स्वच्छता निरीक्षक राहुल राजगोळकर, प्रभाग मुकादम सागर देवकुळे,  स्वच्छतादूत अमित देशपांडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी आदीसह  नागरिक सहभागी झाले होते.