राशिवडे येथे कुटुंब नियोजनाबाबत प्रबोधन शिबिर

0
217

राशिवडे (प्रतिनिधी) :  कुटुंब नियोजनासंदर्भात ‘धर्मा लाइफ’ या संस्थेच्या वतीने  नवीन लग्न झालेली जोडपी आणि एक मुल असणारी जोडपी यांचे प्रबोधन केले जाते. त्या अनुषंगाने आज (शुक्रवार) राशिवडे बुद्रुक येथे फिरत्या चित्ररथामार्फत जनजागृती करण्यात आली.

यावेळी जवळपास ५०० हून अधिक लाभार्थ्यांनी याविषयी माहिती घेतली. यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्याने  व्ही.आर  प्रोजेक्ट द्वारा संबंधित लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेच्या युवाकार राधिका लाड आणि कृष्णा लाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर संस्थेच्या वतीने प्रोजेक्ट मॅनेजर सम्राट शेंडगे उपस्थित होते.