भालचंद्र कदम यांना कलारत्न पुरस्कार प्रदान

0
289

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सुप्रभात बँडचे निर्माते भालचंद्र दत्तात्रय कदम यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा १७ वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा शाहूपुरीतील आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे झाला. भालचंद्र कदम हे गेली ५५ वर्षेपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. भजन, कलापथक, मेळा, सर्कस, बँड बेंजो या माध्यमातून त्यांनी आपली कला जोपासली आहे. आता बँडच्या माध्यमातून सेवा चालूच आहे.

हा पुरस्कार त्यांना ‘जीव माझा गुंतला’ फेम अंतरा व मल्हार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे, आमदार जयश्री जाधव, ‘आभाळाची माया’ फेम जयदेव, राज्य उपाध्यक्ष जयवंतराव वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अनिता पाटील व कलाकार महासंघातील सर्व कलाकार पदाधिकारी उपस्थित होते.