Published June 3, 2023

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे.

यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये परिसरातील गरजेनुसार 20 टक्के पर्यंत बदल केला जाणार आहे. परीक्षा पद्धती मध्येही बदल केला जाऊ शकतो. यासाठी स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून आसपासच्या परिसरासाठी व जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले विषय हे अभ्यासक्रमामध्ये घातले जाऊ शकतात.

भौतिक गरजांचा विचार, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध या निमित्ताने होणार आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले जातील. यामुळे ‘मेक इन इंडिया’ साठी याचा निश्चितच हातभार लागेल. परीक्षेचे निकाल हे वेळेवर लागतील व विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चितच फायदा होईल.

महाराष्ट्रामध्ये 4500 महाविद्यालये आहेत. यामध्ये 95 महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठांमध्ये 36 महाविद्यालये ही स्वायत्त दर्जा प्राप्त झालेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या शंभर महाविद्यालयांमध्ये एसपीकेचा सहभाग झाला आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये पहिल्या ४० महाविद्यालयांमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयास हा दर्जा प्राप्त झालेला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नोकरीच्या संधी उपलब्ध होणे, सर्टिफिकेट कोर्सेस व अनुभवावर आधारीत शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांना या मध्ये अनेक संधी प्राप्त होतील.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत भोसले, कार्याध्यक्ष शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले, युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदींसह प्राध्यापक उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023