गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आढावा बैठकीत व्यापाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर शहरातील वाहतुकीची कोंडी, पोलीस ठाण्यात फिर्याद घेण्यास टाळाटाळ अशा तक्रारींचा पाढा गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आढावा बैठकीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनी  उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासमोर वाचला. जनतेच्या सहकार्याने वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी दिले. या बैठकीत वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्सचा… Continue reading गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आढावा बैठकीत व्यापाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

नागरिकांच्या तक्रारींचे निरसन होणे आवश्यक : मनोज लोहिया

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर परिसरात वाढणारी गुन्हेगारी कशी कमी व्हावी, यासाठी नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निरसन होणे आवश्यक असते. ते जर होत नसेल तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असा इशारा कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिला. ते आज (सोमवार) इचलकरंजीत बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस… Continue reading नागरिकांच्या तक्रारींचे निरसन होणे आवश्यक : मनोज लोहिया

‘कोजिमाशि’च्या सर्वसाधारण सभेविरोधात तक्रार करणार : समीर घोरपडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक (कोजिमाशि) पतसंस्थेची रविवारी झालेली ५० वी ऑनलाईन सभा चुकीच्या पध्दतीने झाली आहे. सभासदांच्या हक्कावर गदा आणण्यात आली आहे. तरी या सभेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करून सभेविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार असल्याची माहिती राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे संचालक समीर घोरपडे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. … Continue reading ‘कोजिमाशि’च्या सर्वसाधारण सभेविरोधात तक्रार करणार : समीर घोरपडे

हाती काहीच लागणार नाही, अफवांची धुळवड थांबवा : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : मी ठामपणे सांगतो, अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये अहमदाबादमध्ये भेट झाल्याचे वृत्त समोर आले… Continue reading हाती काहीच लागणार नाही, अफवांची धुळवड थांबवा : संजय राऊत

शहा-पवार यांची भेट न झाल्याचे सांगण्याची ‘त्यांच्या’ नेत्यांमध्येच स्पर्धा : चंद्रकांतदादांचा टोला

पुणे (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काल दिवसभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. शरद पवार आणि अमित शाह यांच्यात नक्की भेट झाली का, हे मला माहिती नाही. पण अमित शाह यांनी काल केलेलं वक्तव्य पाहता ही भेट झाली… Continue reading शहा-पवार यांची भेट न झाल्याचे सांगण्याची ‘त्यांच्या’ नेत्यांमध्येच स्पर्धा : चंद्रकांतदादांचा टोला

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७४ जणांवर दंडात्मक कारवाई

 कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात  कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली.  यामध्ये २७४ जणांकडून ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे,  सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे,  सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरात कोरोना… Continue reading कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७४ जणांवर दंडात्मक कारवाई

मांडेदुर्गला स्मार्ट गाव बनवू : गोपाळराव पाटील

चंदगड  (प्रतिनिधी) :  मांडेदुर्ग गावाच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी आणून स्मार्ट गाव करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी केले. मांडेदुर्ग (ता. चंदगड)  येथे त्यांच्या हस्ते १६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण आणि विद्याताई पाटील यांच्या निधीतून मांडेदुर्ग गावातील अंतर्गत… Continue reading मांडेदुर्गला स्मार्ट गाव बनवू : गोपाळराव पाटील

राशिवडेकरांनी जपली सामाजिक बांधिलकी

राशिवडे (प्रतिनिधी) :  होळीत पडणारी पोळी  एखाद्या गरजू,  भुकेल्याच्या मुखास लागावी. तसेच निराधार, गोरगरीब लोकांना सणाचा आस्वाद मिळावा, या हेतूने गावातील अनेक तरुण मंडळांच्या माध्यमातून पोळ्या जमा करण्याचे आवाहन शिवबा प्रतिष्ठानने केले होते. त्यास राशिवडेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जमा झालेल्या पोळ्या कोल्हापूर येथील निराधार आणि वृद्ध लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘एकटी’ या संस्थेसाठी,  एचआयव्ही  बधितांसाठी कार्यरत… Continue reading राशिवडेकरांनी जपली सामाजिक बांधिलकी

‘जगदंबा’ तलवारीसाठी सज्जाकोठीवर शिवभक्तांचा ठिय्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत आणावी, या प्रमुख मागणीसाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेने  गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य व केंद्र शासनाने याकडं दुर्लक्ष केल्यानं शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शिवभक्तांनी आक्रमक होत पन्हाळागडावर आज (सोमवार) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पन्हाळगडावरील… Continue reading ‘जगदंबा’ तलवारीसाठी सज्जाकोठीवर शिवभक्तांचा ठिय्या…

वळीवडे येथील विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक यात्रा रद्द

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वळीवडे (ता.  करवीर) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा  निर्णय ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. वर्गणी न काढता, डिजिटल फलकाला फाटा देत केवळ  धार्मिक विधी करत यात्रा साधेपणाने होणार  आहे. ५  ते ९  एप्रिलअखेर होणाऱ्या धार्मिक विधीचा खर्च  ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात… Continue reading वळीवडे येथील विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक यात्रा रद्द

error: Content is protected !!