नेर्ली येथे शिवस्मारक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेर्ली गावातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींसाठी अद्ययावत वातानुकुलीत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. नेर्ली (ता.करवीर) येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामाची पाहणी… Continue reading नेर्ली येथे शिवस्मारक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार : आ. ऋतुराज पाटील

एस. टी. कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रयत्नशील : ना. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड प्रतिबंधक लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन कालावधीत कर्तव्य बजावले असून परप्रांतीय लोकांना सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे. शिवाय चालक-वाहक वर्गाचा रोज… Continue reading एस. टी. कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रयत्नशील : ना. सतेज पाटील

इचलकरंजी बसस्थानकाला छ. शिवाजी महाराजांचे नाव द्यावे : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाला छ. शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्‍नी तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या गुढीपाडव्यापर्यंत शिवप्रेमी त्याठिकाणी गुढी उभारतील. तसेच कॉ. मलाबादे चौकाचे नाव न बदलता छ. संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा,  अशी मागणी आ. प्रकाश आवाडे यांनी केली आहे. यावेळी… Continue reading इचलकरंजी बसस्थानकाला छ. शिवाजी महाराजांचे नाव द्यावे : आ. प्रकाश आवाडे

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवार) दिवसभरात ६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच  ४८० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४७, आजरा तालुक्यातील ४, गडहिंग्लज तालुक्यातील ३,  हातकणंगले तालुक्यातील ५, करवीर तालुक्यातील १२, पन्हाळा तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच

गोकुळ निवडणूक : आ. प्रकाश आबिटकर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच…

गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आ. प्रकाश आबिटकर यांचेसाठी खा. संजय मंडलिक यांचा शब्द अंतिम असेल, अशी चर्चा रंगली आहे. आ. आबिटकर यांनी अजून या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये. त्यामागे कार्यकर्त्यांचा असणारा दबाव आणि जागावाटप हे दोन मुद्दे कळीचे ठरत आहेत. त्यामुळेच अजून हा निर्णय होत नसल्याचे बोलले जात आहे. गोकुळच्या… Continue reading गोकुळ निवडणूक : आ. प्रकाश आबिटकर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच…

गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू…

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील सेट्रींग व्यवसाय करणाऱ्या निलेश अंतु माळगे (वय ४५) याचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (सोमवार) सकाळी येथील मराठा चौकात एका  मंडळाच्या खोलीत उघडकीस आली. मात्र, हा घातपात की अपघात हे अद्याप कळाले नाही. गडमुडशिंगी येथील निलेश माळगे हे सेंट्रींग व्यवसाय करीत होते. ते पत्नी आणि दोन मुलांसह… Continue reading गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू…

आ. आबिटकरांसाठी खा. मंडलिकांचा शब्द अंतिम, पण…

गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आ. प्रकाश आबिटकर यांचेसाठी खा. संजय मंडलिक यांचा शब्द अंतिम असेल, अशी चर्चा रंगली आहे. आ. आबिटकर यांनी अजून या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये. त्यामागे कार्यकर्त्यांचा असणारा दबाव आणि जागावाटप हे दोन मुद्दे कळीचे ठरत आहेत. त्यामुळेच अजून हा निर्णय होत नसल्याचे बोलले जात आहे. गोकुळच्या… Continue reading आ. आबिटकरांसाठी खा. मंडलिकांचा शब्द अंतिम, पण…

विनापरवाना भिशीद्वारे पावणेचार लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक…

करवीर (प्रतिनिधी) : विनापरवाना भिशी चालवून महिलांची ३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गांधीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सचिन उर्फ आनंदा कांबळे (वय ३४, रा. बिरदेव मंदिराशेजारी,  गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी दिली आहे. सौ. अश्विनी अनिल दांगट (वय ३४, रा. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना रस्ता, गडमुडशिंगी)… Continue reading विनापरवाना भिशीद्वारे पावणेचार लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक…

प्रिया बेर्डेपाठोपाठ ‘ही’ मराठी गायिका राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडे  आता  राजकीय सूर काढणार आहे. वैशाली बुधवारी (दि.३१) मुंबईच्या ‘एनसीपी’ कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. आपल्या गायन शैलीने वैशालीने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगीत क्षेत्रात स्वतःचं वेगळं… Continue reading प्रिया बेर्डेपाठोपाठ ‘ही’ मराठी गायिका राष्ट्रवादीत प्रवेश करणार

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून  दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (सोमवार) दुपारी केली. त्यामुळे भाजपचे समाधान आवताडे यांच्याशी भगीरथ यांची अटीतटीची लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा… Continue reading पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

error: Content is protected !!