इचलकरंजीमध्ये पोलिस प्रशासनाचा कारवाईचा बडगा… 

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासनाने आज (शनिवार) पासून पुन्हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये अकरा वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवासोडून जे व्यापारी आपले उद्योग चालू ठेवत आहेत तसेच विनाकारण गाडीवरुन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर इचलकरंजीमध्ये कारावाईचा बडगा उचलला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक एस. पी. गायकवाड, ग्रामीण पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार गावभागचे सपोनि. गजेंद्र लोहार, शिवाजीनगर… Continue reading इचलकरंजीमध्ये पोलिस प्रशासनाचा कारवाईचा बडगा… 

गिरगावमधील कोरोनाबाधिताचा ऑक्सिजनअभावी मृत्यू  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने आज (शनिवार) सकाळी ९ च्या दरम्यान एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला. माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे (वय ४१, रा. गिरगाव, ता. करवीर) असे मृताचे नांव आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. एकीकडे प्रशासनाकडून ऑक्सिजन कमी पडू देणार नसल्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे मात्र, ऑक्सिजन अभावी या… Continue reading गिरगावमधील कोरोनाबाधिताचा ऑक्सिजनअभावी मृत्यू  

महाराष्ट्र दिन : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई,  महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे,  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,  अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,… Continue reading महाराष्ट्र दिन : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हा पोलीस प्रमुखांकडून हातकणंगले पोलिसांचे कौतुक

हातकणंगले (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या  माध्यमातून संचारबंदी दरम्यान जिल्ह्यात राबविलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी  हातकणंगले पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रभावीपणे कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करा. कामात  कसूर करणाऱ्यांची गय करू नका, अशा सूचना पोलीस दलाला दिल्या. दरम्यान, पोलीस उपाधीक्षक साहिल झरकर यांच्या… Continue reading जिल्हा पोलीस प्रमुखांकडून हातकणंगले पोलिसांचे कौतुक

राज्यात लसीकरण वाढविणार, आणखी निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने लॉकडाऊन जाहीर केला नसता तर कोरोना रुग्णांची संख्या ९ ते १० लाखांवर गेली असती. नाइलाजाने कडक निर्बंध लागू करणे राज्य सरकारला भाग पडले. राज्यातील जनता संयमाने हे निर्बंध पाळत आहे. आणखी कडक निर्बंध लागणार नाहीत. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जनतेला आणखी काही दिवस निर्बंध पाळावे लागतील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव… Continue reading राज्यात लसीकरण वाढविणार, आणखी निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री

आळते येथे उद्यापासून पाच दिवस कडकडीत बंद…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळतेमध्ये आज (शुक्रवार) कोरोना दक्षता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आळतेमध्ये पाच दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गावात २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. तर १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या बंदमध्ये दूध तसेच मेडिकल्स, दवाखाने सुरु राहणार आहेत. तर… Continue reading आळते येथे उद्यापासून पाच दिवस कडकडीत बंद…

जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३६३ आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. ना. यड्रावकर म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करणे, उपकेंद्रांची डागडूजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटी आणि मजबूत करणे यासाठी हा… Continue reading जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जिल्ह्यातील ३ पोलीस अधिकारी, २२ अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील ३ पोलीस अधिकाऱ्यांसह २२ पोलीस अंमलदारांना १ मे रोजी साजरा होणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालक पदक जाहीर जाहीर झाले आहे. त्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. महासंचालक पदक जाहीर झालेल्यांमध्ये – श्रीकृष्ण कटकधोंड पोलीस निरीक्षक… Continue reading जिल्ह्यातील ३ पोलीस अधिकारी, २२ अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर…

शहापूर येथील खणीमध्ये युवकाचा मृतदेह आढळला…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर येथील खणीमध्ये एका युवकाचा मृतदेह आज (शुक्रवार) सापडला आहे. हा मृतदेह सकाळच्या सुमारास नागरीकांच्या निदर्शनास आला. त्यांनतर शहापूर पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, या मृत युवकाचे नाव सचिन शिवराम भिंगे (वय २८, रा. विठ्ठलनगर, शहापूर) असे आहे. सचिनला दारुचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांच्याकडून मिळाली आहे.

राज्यातील शाळांना उद्यापासून सुट्टी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनेकडून… Continue reading राज्यातील शाळांना उद्यापासून सुट्टी…

error: Content is protected !!