पन्हाळ्यातील क्रिडांगणाच्या राखीव जागेच्या सभेला सत्ताधारीच गैरहजर…  

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळ्यातील लीज असलेल्या जागेवर वीस वर्षांपासुन क्रिडांगण म्हणून राखीव जागा ठेवली होती. या जागेवरील आरक्षण उठवून लाखमोलाची जागा धनिकांच्या हातात जाणार की क्रिडांगण म्हणूनच राहणार. यासाठी काल (मंगळवार) एक खास सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सत्तारुढ जनसुराज्यचे नगरसेवकच या ऑनलाईन सभेला गैरहजर राहीले. त्यामुळे या प्रकऱणाचे गुढ आणखी वाढले आहे.   … Continue reading पन्हाळ्यातील क्रिडांगणाच्या राखीव जागेच्या सभेला सत्ताधारीच गैरहजर…  

ऑटोरिक्षा अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात : डॉ. स्टीव्हन अल्वारिस

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  परिवहन विभागाने कोरोनाच्या काळामध्ये ऑटो रिक्षा परवानाधारकांना १,५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार आजपर्यंत कार्यालयाकडे ६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आजवर कार्यालयाने  ५,४०० इतक्या अर्जांवर कारवाई केली आहे. या परवानाधारकांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पात्र परवानाधारकांनी या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन… Continue reading ऑटोरिक्षा अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात : डॉ. स्टीव्हन अल्वारिस

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,५०८ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,५०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज (बुधवार) दिवसभरात १,७३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ७,१७२ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३६५, आजरा तालुक्यातील २४, भुदरगड तालुक्यातील ३४, चंदगड तालुक्यातील १७, गडहिंग्लज तालुक्यातील ४५, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,५०८ जणांना कोरोनाची लागण…

आदर्श फौंडेशनतर्फे जयसिंगपूर येथील कोव्हिड सेंटर्सना मदतीचा हात…

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत जयसिंगपूरातील आदर्श फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुनीर शेख यांनी जयसिंगपूर कोव्हिड सेंटरला साहित्य प्रदान केले. तर लॉकडाऊनच्या काळात काम नसल्यामुळे गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच आगर येथील कोव्हिड सेंटरमध्ये दोन ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच अन्य कोव्हिड सेंटरना आर्थिक… Continue reading आदर्श फौंडेशनतर्फे जयसिंगपूर येथील कोव्हिड सेंटर्सना मदतीचा हात…

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने कोविड-19 लसीकरण मोहिम महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राबविणेत येत आहे. कोल्हापूर शहरातील परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहिमेचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. तरी अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसहीत (उदा. परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळालेचे निश्चितीपत्र, परदेशी व्हीसा, व्हिसा मिळणेसाठी संबंधीत… Continue reading उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम…

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर, बायपॅप उपलब्ध : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमधे व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरला पर्याय ठरत असलेल्या ऑक्सिजन कौंन्सेटेटर आणि बायपॅपची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय रुग्णालयांमध्ये सीएसआर फंडामधून ऑक्सीजन कोंन्सेटेटर आणि बायपॅप उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर, बायपॅप उपलब्ध : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोरोना चाचणीसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करावा. चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या आणि सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे. ग्रामस्तरीय अलगिकरण कक्ष स्थापन करावेत. तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ते कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या सर्व पथक… Continue reading कोरोना चाचणीसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी

हालोंडी येथे दोन गटात मारहाण : परस्परांविरोधी गुन्हा दाखल

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथे दोन शेजारी राहणाऱ्या गटात तलवार, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठ्यांनी झालेल्या मारामारीत सातजण जखमी झाले आहेत. त्यांनी परस्परां विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे फिर्यादी जयप्रकाश बापुसो पाटील (वय ६०, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) आणि अर्चना काकासो पाटील (रा.… Continue reading हालोंडी येथे दोन गटात मारहाण : परस्परांविरोधी गुन्हा दाखल

प्रभागनिहाय लसीकरण केंद्र वाढवा : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी प्रभागनिहाय केंद्र वाढवा, सर्वसामान्य नागरिकांना सहजरित्या लस उपलब्ध झाली पाहिजे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करावे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याबरोबरच तिसरी लाट येऊच नयेत यादृष्टीने प्रशासनाने काम करावे अशा सूचना आ. चंद्रकांत जाधव यांनी प्रशासनाला दिल्या. आ. जाधव म्हणाले की, लसीकरणासाठी… Continue reading प्रभागनिहाय लसीकरण केंद्र वाढवा : आ. चंद्रकांत जाधव

जिल्ह्यातून परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशी मागणी आ. ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशातील… Continue reading जिल्ह्यातून परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : आ. ऋतुराज पाटील

error: Content is protected !!