मला शिकवू नका, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार ! : संभाजीराजे

अहमदनगर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावरून भाजपचे खासदार संभाजीराजे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद धुमसू लागलाय. संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहेत, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे. तर मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, अशा शब्दांत… Continue reading मला शिकवू नका, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार ! : संभाजीराजे

ज्येष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन : कोल्हापूरच्या कलाविश्वावर शोककळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मागील ४० वर्षांपासून संगीतकार, गायक, उत्कृष्ट तबलावादक आणि अभिनय क्षेत्रात ठसा उमटवलेले चंद्रकांत कागले (वय ५६, रा. कोल्हापूर) यांचे आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चंद्रकांत कागले यांनी संगीतकार म्हणून… Continue reading ज्येष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन : कोल्हापूरच्या कलाविश्वावर शोककळा

बामणे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

गारगोटी (प्रतिनिधी) : बामणे (ता. भुदरगड) येथील हनुमान दूध संस्थेचे चेअरमन वसंत बोरनाक व संस्थेचे संचाला, भावेश्वरी सेवा संस्थेचे चेअरमन पांडुरंग लोंढे व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गारगोटी येथे आ. प्रकाश आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी शिवबंधन बांधले. या वसंत बोरनाक म्हणाले की, मागील ७ वर्षांत आ. आबिटकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा… Continue reading बामणे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

टोप येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू…

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यामुळे मेंढपाळांचे सुमारे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले आहे. गावाच्या पूर्वेस वेताळमाळ नजीक असलेल्या शेतात सोमा अन्नाप्पा सिसाळ व सहकाऱ्यांच्या  बकऱ्यांचा तळ बसला आहे. नेहमीप्रमाणे मेंढपाळ लहान पिल्ले डालग्यात (जाळी) ठेवून मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी… Continue reading टोप येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू…

यड्राव येथे किराणा व्यापाऱ्याचा खून : संशयितास अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंधातून एका तरुण व्यापाऱ्याचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा.बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव असून आरोपी अजित उर्फ पिंटू आदमाने (वय ४०, रा. बेघर वसाहत, यड्राव) याने स्वतः शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला… Continue reading यड्राव येथे किराणा व्यापाऱ्याचा खून : संशयितास अटक

जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत एकूण १,८५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) १,३६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तब्बल ९,३२९ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ५४६, आजरा ७३, भुदरगड ३८,… Continue reading जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

आर.के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण…

पाचगांव (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे लसीकरण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून हे लसीकरण झाले. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या काळात ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्रशासनानेही महत्त्व दिले… Continue reading आर.के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण…

जिल्हा परिषदेकडून छ. शाहू पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबविण्यात विकासकामांमध्ये येणाऱ्या विविध जि. प. व व पंचायत समिती सदस्य, जि.प. कर्मचारी यांचे यांचाही सहभाग मोठा असतो. जि.प. व पं.स.सदस्य व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा व पुढील काम करणेस प्रोत्साहन मिळावे या करिता जिल्हा परिषदेकडून २०२०-२१ चा जिल्हा परिषद कर्मचारी (वर्ग ३) मधील (ग्रामसेवक व शिक्षक सोडून)… Continue reading जिल्हा परिषदेकडून छ. शाहू पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे जाहीर…

इचलकरंजीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीची कार्यवाही थांबवा : नगराध्यक्ष

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी हाती घेण्यात आलेल्या मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याचे आदेश नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिले आहेत. कोरोना महामारीमुळे नगरपरिषदेच्यावतीने चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे काम स्थगित ठेवण्यात आले होते. त्यामुळे सन २०२१-२२ ते २०२४-२५ सालासाठीच्या कर आकारणीसाठी मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेऊन त्यासाठी कर्मचार्‍यांची… Continue reading इचलकरंजीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीची कार्यवाही थांबवा : नगराध्यक्ष

‘त्या’मुळेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाहीच..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून म्हणजे ५ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सध्या ४ थ्या गटात आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याने पुढील… Continue reading ‘त्या’मुळेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाहीच..?

error: Content is protected !!