शालेय शुल्क तपासणी पथक नेमा, अन्यथा घंटानाद : ‘आप’चा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही शाळा पालकांकडून अवाजवी शालेय शुल्काची मागणी करीत आहे. अशाप्रकारच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शालेय शुल्क तपासणी टास्कफोर्स नेमावा अशी मागणी आमआदमी पार्टीने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. उपसंचालकांनी यावर अजून कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आज (बुधवार) आपने  शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना घंटानाद करण्याचा इशारा दिला. शालेय शुल्क तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात ज्या… Continue reading शालेय शुल्क तपासणी पथक नेमा, अन्यथा घंटानाद : ‘आप’चा इशारा

जिल्ह्यात दिवसभरात १६३२ जण कोरोनामुक्त…  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १६९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २४१ तर करवीर तालुक्यात ३०० तर हातकणंगले तालुक्यात १९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल १९,१३६ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात १६३२ जण कोरोनामुक्त…  

मौनी विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या शासकीय प्रतिनिधीपदी बाजीराव चव्हाण

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर शासकीय प्रतिनिधी म्हणून बाजीराव कुंडलिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार ढेंगे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. या पदी चव्हाण यांची निवड झाल्याचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे, अवर सचिव वि. व. दळवी यांनी पाठवले आहे. बाजीराव चव्हाण हे भुदरगड तालुक्यामध्ये राजकीय… Continue reading मौनी विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या शासकीय प्रतिनिधीपदी बाजीराव चव्हाण

शिवा काशीद स्मृतिदिनानिमित्त सरनाईक कॉलनीत मोफत डोळे तपासणी शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवशक्ती प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा, सरनाईक कॉलनी शाखेच्या वतीने वीर शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल (मंगळवारी) मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५० पेक्षा जास्त जणांची तपासणी करण्यात आली. सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशाला येथे आयोजित केलेल्या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन झाल्यानंतर शिबिराला सुरुवात झाली.… Continue reading शिवा काशीद स्मृतिदिनानिमित्त सरनाईक कॉलनीत मोफत डोळे तपासणी शिबिर

केमिस्ट असोसिएशनतर्फे गारगोटीच्या संजय पाटील यांचा उत्कृष्ट सभासद पुरस्काराने गौरव

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने गारगोटी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी मेडिकलचे मालक संजय रघुनाथ पाटील यांचा २०२०-२१ चा उत्कृष्ट सभासद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव मदन पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय पाटील यांचे गारगोटी येथे मागील तीस वर्षांपासून औषध… Continue reading केमिस्ट असोसिएशनतर्फे गारगोटीच्या संजय पाटील यांचा उत्कृष्ट सभासद पुरस्काराने गौरव

शिक्षकांनी निवृत्तीनंतर शैक्षणिक कार्यासाठी प्रवृत्त व्हावे : पल्लवी कोरगांवकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवृत्तीनंतर अखंड शैक्षणिक कार्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन उद्योजिका आणि कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर यांनी केले. त्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांच्या निवृत्ती सन्मान सोहळ्यात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव वंदना काशीद होत्या. पल्लवी कोरगांवकर म्हणाल्या की, शिक्षक हा अखंड विद्यार्थी असतो. आपल्या चौतीस… Continue reading शिक्षकांनी निवृत्तीनंतर शैक्षणिक कार्यासाठी प्रवृत्त व्हावे : पल्लवी कोरगांवकर

मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारनं परवानगी नाकारली आहे. अर्थात, बऱ्याच वारकऱ्यांनी या निर्णयाला विरोध आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याही पुढे जाऊन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वारकऱ्यांनी आपला संताप योग्य पद्धतीने व्यक्त केला आहे. आता… Continue reading मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…

लाईव्ह मराठी स्पेशल : मोक्याच्या जागा विकल्यानंतरही शेतकरी संघ कर्जाच्या खाईतच… (भाग ३)

कोल्हापूर (सरदार करले) : भ्रष्टाचार, अपहार, उधारी यामुळे शेतकरी संघाचे कंबरडे मोडले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना विश्वस्तांनी पर्याय निवडला. तो म्हणजे, संघाच्या मोक्याच्या जागा विकणे. अर्थात, त्यातून त्यांना चांगली कमाई होणार हे पक्के माहीत होते. कावळा नाक्याजवळ संघाची मोक्याची सुमारे चार एकर जागा होती.… Continue reading लाईव्ह मराठी स्पेशल : मोक्याच्या जागा विकल्यानंतरही शेतकरी संघ कर्जाच्या खाईतच… (भाग ३)

आता राहुल रेखावर कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी : दौलत देसाई यांची बदली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली झाल्याचे वृत्त आहे. त्यांची वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. आता राहुल रेखावर हे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असतील. देसाई यांनी कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यात चांगले काम केले होते.

कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आदर्शवत शिवसंपर्क अभियान राबवावे : ना. उदय सामंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काम तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेऊन शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रभागनिहाय शाखांची स्थापना करावी. त्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. पुढील १२ दिवसात राज्यात आदर्शवत ठरेल असे शिवसंपर्क अभियान कोल्हापुरातील शिवसैनिकांनी राबवावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिल्या. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या… Continue reading कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आदर्शवत शिवसंपर्क अभियान राबवावे : ना. उदय सामंत

error: Content is protected !!