महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील मुदत संपलेल्या २३ महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. नव्या आदेशाप्रमाणे त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित सर्व महानगरपालिकांना त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेतही  शहरातील  प्रभाग रचनेबाबत तयारी सुरू केली आहे. उपायुक्त रविकांत अडसूळ … Continue reading महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश 

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही ? : खा. संजय राऊत म्हणाले…

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांच्या नजरा असतात. पण कोरोनामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा उत्साहात झाला नाही. त्यामुळे यंदा तरी मेळावा होणार का? असा प्रश्न असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आज (बुधवार) ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की, दसरा मेळावा नक्कीच होईल… Continue reading शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही ? : खा. संजय राऊत म्हणाले…

सणासुदीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा आजपासून (बुधवार) वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १ ऑक्टोबररोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यापुढे एलपीजी… Continue reading सणासुदीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

इचलकरंजी येथे एसटी बसेस, दुचाकींची तोडफोड : ४ कर्मचारी गंभीर जखमी

इचलकरंजी  (प्रतिनिधी) : येथील एसटी आगारामध्ये काही अज्ञातांनी घुसून १२ एसटी बस आणि ५ दुचाकींची तोडफोड केली.  यात ४ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा झाला. ही तोडफोड कोणी केली. व त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या एसटी बसच्या अपघातात एक तरूण ठार झाला होता. या रागाच्या… Continue reading इचलकरंजी येथे एसटी बसेस, दुचाकींची तोडफोड : ४ कर्मचारी गंभीर जखमी

पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी तसेच महापूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विशेष केंद्रीय पथक आज (मंगळवार) पाहणीसाठी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय पथकातील सदस्यांसोबत खा. धैर्यशील माने यांनी चर्चा केली. यावेळी केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्तांना भरीव निधी मिळावा अशी मागणी खा. माने यांनी केली. यावेळी, महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर… Continue reading पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी : खा. धैर्यशील माने

प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांचा मुलाविरोधात कठोर कारवाई करावी. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे मलाबादे चौक येथे आज (मंगळवार) सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच घडलेल्या… Continue reading प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने…

शिरोली पुलाची येथील पाण्याच्या टाकी परिसरातील अतिक्रमण ग्रा.पं. ने हटवली…

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील माळवाडी भागात असणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरातील पंधरा नागरिकांची केलेले अतिक्रमण आज (मंगळवार) ग्रामपंचायतीने हटवली. या जागेमध्ये पंधरा नागरीकांनी अतिक्रमण केले होते. माळवाडी पैकी सावरकरनगर येथील पाण्याची टाकीलगत सार्वजनिक गायरान जागेमध्ये पंधरा नागरिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढून घेण्याबाबतची नोटीस ग्रामपंचायतीने दिली होती.  मात्र, अतिक्रमणधारकांनी बांधकाम… Continue reading शिरोली पुलाची येथील पाण्याच्या टाकी परिसरातील अतिक्रमण ग्रा.पं. ने हटवली…

महावितरणमधील भरती प्रक्रिया पारदर्शक : ना. प्राजक्त तनपुरे

मुंबई (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल, त्यांना नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असा प्रकारे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी… Continue reading महावितरणमधील भरती प्रक्रिया पारदर्शक : ना. प्राजक्त तनपुरे

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला गुरूवारपासून (दि. ७)  सुरूवात होत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे 1)  कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन,… Continue reading सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

केंद्रीय पथकाकडून शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडीतील पूरग्रस्त भागाची पाहणी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेती पिके, घरे व दुकानांची आज (मंगळवार) पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय पथकाने शिरोळ येथील ऊस शेती पिकाची पाहणी केली. येथील शेतकरी गिरीश कवळेकर व कृषी मित्र युसुफ सिकंदर किरणे व… Continue reading केंद्रीय पथकाकडून शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडीतील पूरग्रस्त भागाची पाहणी  

error: Content is protected !!