जिल्ह्यात चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ चा मृत्यू झाला असून १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ६, आजरा – ०, भुदरगड – १, चंदगड – ०, गडहिंग्लज – १, गगनबावडा – ०, हातकणंगले – १, कागल – ०, … Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

दसऱ्याच्या दिवशीही केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू : डॉ. ए. बी. माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा उद्या (शुक्रवार) दसऱ्यादिवशीही सुरू राहणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी.  माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केडीसीसी बँकेने अलीकडेच साडेसात… Continue reading दसऱ्याच्या दिवशीही केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू : डॉ. ए. बी. माने

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला माराहण केल्याप्रकरणी एकाला पाच वर्षांची शिक्षा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला पाणी सोडण्याच्या कारणावरून मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा करुन मारहाण केल्याबद्दल आज (गुरुवार) एकाला ५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी सुनावली. स्वप्नील उर्फ युवराज अनंतराव मिरजकर (वय ३४, रा.कोयना कॉलनी, गांधीनगर) असे शिक्षा झालेल्या… Continue reading ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला माराहण केल्याप्रकरणी एकाला पाच वर्षांची शिक्षा…

‘गोडसाखर’बाबत संचालकांच्या ‘यु’टर्नमुळे पुन्हा संभ्रम…

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : उणे नेटवर्थमुळे अर्थसहाय्य उपलब्ध होत नसल्याने ‘गोडसाखर’ भाडेतत्वावर चालवायला देऊया म्हणत, विशेष सर्व साधारण सभेत संचालकांनी ‘गळ्यात गळे घालून’ सभासदांकडून ठराव घेतला. साखर संचालकांकरवी तो मंत्री समितीकडे पाठवला. पण जेंव्हा मंत्री समिती त्यावर निर्णय घ्यायला बसली तेंव्हा पुन्हा कांही संचालकांनी अचानक ‘यु’ टर्न घेत ‘तो’ ठराव माहीतचं नसल्याचा आव आणला. पण… Continue reading ‘गोडसाखर’बाबत संचालकांच्या ‘यु’टर्नमुळे पुन्हा संभ्रम…

महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रात ५. ६४ कोटींच्या वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

पुणे  (प्रतिनिधी) : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून वीजचोरीविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १४१८ ठिकाणी १ कोटी २८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा महावितरणकडून नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे. या एक दिवसीय विशेष मोहिमेत आतापर्यंत ४९८३ ठिकाणी ५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत… Continue reading महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रात ५. ६४ कोटींच्या वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या  प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी  आपल्या वाढदिवसानिमित्त महावीर उद्यान येथे वृक्षारोपण केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेतील तसेच ज्यांना कोरोनाची लागण होऊन जे बरे झालेले आहेत. अशा सर्व कर्मचारी व नागरिकांनी पर्यावरणासाठी किमान एका वृक्षाचे रोपण करुन त्याचे संगोपन करावे. आपल्या भोवतालचा परिसरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन वायूची निर्मिती कशी वाढेल, त्यासाठी प्रत्येकाने… Continue reading प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

‘गोकुळ’चा एका दिवसात १५ लाख १४ हजार लिटर्स दूध विक्रीचा उच्‍चांक 

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ)  इतिहासात दूध विक्रीमध्‍ये १३  ऑक्टोबररोजी नविन उच्‍चांक नोंदवला. त्याबद्दल आज (गुरूवार) संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालामध्‍ये कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला. गोकुळने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ  देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध… Continue reading ‘गोकुळ’चा एका दिवसात १५ लाख १४ हजार लिटर्स दूध विक्रीचा उच्‍चांक 

शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री अंबाबाईची शिवदूती चामुंडेच्या स्वरुपात पुजा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज अश्विन शुद्ध नवमी शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा अखेरचा दिवस. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शिवदूती चामुंडेच्या रूपामध्ये सजली आहे. आजवरच्या सर्व मातृका कुठल्या न कुठल्या पुरुष देवतेच्या शक्तिरूप होत्या. पण शक्तीतून निर्माण झालेली साक्षात शक्ती अशी ही उग्र चामुंडा शिवदूती आहे. सर्व मातृकागणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जगदंबा कौशिकीच्या शरीरातून एक अति भीषण,… Continue reading शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री अंबाबाईची शिवदूती चामुंडेच्या स्वरुपात पुजा…

गडमुडशिंगी विद्या मंदिरचा आदर्श शाळा योजनेत समावेश करा : आ. ऋतुराज पाटील  

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या नूतन इमारतीसाठी  तातडीने निधी दिला जाईल, अशी  ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आ. ऋतुराज पाटील यांना दिली.  या शाळेचा समावेश ‘आदर्श शाळा योजने’त करण्याची विनंती आ. पाटील यांनी यावेळी केली. या शाळेच्या जुन्या झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधीबाबत आ. … Continue reading गडमुडशिंगी विद्या मंदिरचा आदर्श शाळा योजनेत समावेश करा : आ. ऋतुराज पाटील  

दलित तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी डिक्की-शाहू समूहामध्ये सामंजस्य करार

कागल (प्रतिनिधी) :  राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालविण्यासाठी दलित समाजातील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि शाहू समूह यांच्यामध्ये  सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कागलमध्ये   व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार… Continue reading दलित तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी डिक्की-शाहू समूहामध्ये सामंजस्य करार

error: Content is protected !!