रयत संघ सहकारातील मानबिंदू : पालकमंत्री  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकाराचे आदर्श मॉडेल असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील रयत संघ हा मानबिंदू आहे. सध्या खासगीकरणाच्या विळख्यात सहकार अडकलेला असताना रयत संघाचे काम आदर्शवत आहे. संघाच्या बैलजोडी छाप हातमिश्र खतावर शेतकऱ्यांनी कायम विश्वास ठेवला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते रयत सेवा कृषि उद्योग सहकारी संघाच्या बैलजोडी छाप हातमिश्र खत उत्पादन शुभारंभात… Continue reading रयत संघ सहकारातील मानबिंदू : पालकमंत्री  

अंबाई टँक परिसरात खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकावर तलवार हल्ला   

कोल्हापूर (प्रतिनिधी)  :  खंडणीचे पैसे देत नसल्याच्या रागातून  एका हॉटेल व्यावसायिकावर तीन फाळकूटदादांनी तलवार हल्ला करून गंभीर जखमी केले.  ही घटना आज (शनिवार) दुपारी कोल्हापुरातील अंबाई टँक परिसरातील मध्यवर्ती चौकात घडली. अक्षय रविंद्र यादव (वय २५,  रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे जखमी हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या प्रकरणी जुना… Continue reading अंबाई टँक परिसरात खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकावर तलवार हल्ला   

‘राजाराम’च्या निवडणुकीत धामोड परिसरातील सभासदांनी सहकार्य करावे : अमल महाडिक

धामोड (प्रतिनिधी)  :  मागील ३०  वर्षांच्या काळात धामोड  (ता. राधानगरी) परिसरातील सुज्ञ सभासदांनी राजाराम साखऱ कारखान्याच्या प्रत्येक योजनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नियमितपणे ऊस पुरवठा केला आहे. तरी आगामी निवडणुकीत  शेतकरी सभासदांनी महाडिकांच्या पाठीशी  राहावे, असे आवाहन माजी आ. अमल महाडिक यांनी आज (शनिवार) येथे केले. धामोड पैकी जाधववाडी येथे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद-कर्मचारी-प्रशासन… Continue reading ‘राजाराम’च्या निवडणुकीत धामोड परिसरातील सभासदांनी सहकार्य करावे : अमल महाडिक

आत्माराम अपार्टमेंट- मेनन बंगला रस्ता २५ दिवस बंद राहणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेच्या  पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाच्यावतीने ताराबाई पार्क येथील आत्माराम अपार्टमेंट ते मेनन बंगला रोड येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम  सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे  १५  ऑक्टोबर ते ९  नोव्हेंबर  या कालावधीत हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सासने मैदान… Continue reading आत्माराम अपार्टमेंट- मेनन बंगला रस्ता २५ दिवस बंद राहणार

कागलमध्ये महिलांसाठी बुधवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर  

कागल  (प्रतिनिधी)  :  कागल येथील राजमाता जिजाऊ महिला समिती आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने  महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिर श्रीराम मंदिर येथे बुधवारी (दि.२०)  १० ते ५  या वेळेत आयोजित केले आहे. यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या तज्ञ डॉ.  रेश्मा पवार  तपासणी आणि मार्गदर्शन करणार असल्याची  माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता… Continue reading कागलमध्ये महिलांसाठी बुधवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर  

पाणंद, वहिवाटीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अर्ज करावेत : जिल्हा प्रशासन

टोप (प्रतिनिधी) : वहिवाटीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ५ नुसार प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये गाव नकाशावर असणारे पाणंद रस्ते व अस्तित्वात असणारे वहिवाटीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला… Continue reading पाणंद, वहिवाटीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अर्ज करावेत : जिल्हा प्रशासन

‘केडीसीसी’कडून अण्णासाहेब पाटील महामंडळाला ७५ कोटींचे अर्थसहाय्य : ना. हसन मुश्रीफ   

कागल  (प्रतिनिधी) :  केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ७५ कोटी रुपये अर्थसहाय्य केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील ७५० बेरोजगार युवकांना उद्योगधंदे,  व्यवसाय,  स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचे  त्यांनी सांगितले. कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते… Continue reading ‘केडीसीसी’कडून अण्णासाहेब पाटील महामंडळाला ७५ कोटींचे अर्थसहाय्य : ना. हसन मुश्रीफ   

सरसेनापती साखर कारखान्याचे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट    

सेनापती कापशी  (प्रतिनिधी)  :  सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीताच्या बॉयलर अग्निप्रदीपन व इथेनॉल निर्मिती हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नाविद मुश्रीफ पुढे म्हणाले की, ९ लाख टन ऊस गाळपासह या हंगामात सहवीज… Continue reading सरसेनापती साखर कारखान्याचे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट    

आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात  

आजरा (प्रतिनिधी) : आजरा साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या वर्षाचा २३  वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ डॉ. आनंद महाराज,  रुग्वेदी भागवत मठ,  हत्तरगी यांच्या प्रमुख उपस्थितीत  चेअरमन सुनिल शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली  संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाला. बॉयलर होमहवन व पुजन संचालक दिगंबर देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी शालनताई देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी… Continue reading आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात  

इचलकरंजीतील शिवतीर्थाचे दिमाखात लोकार्पण

रांगोळी (प्रतिनिधी) : इचलकरंजी  येथील श्री शिवतीर्थचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते  मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. हा दैदिप्यमान लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. लाखोंच्या संख्येने शिवभक्त इचलकरंजी नगरीमध्ये सोहळ्यासाठी दाखल झाले होते. भव्य मिरवणूक, ढोल पथकाचा नाद, तुतारीचा आवाज आणि ‘जय भवानी जय शिवराय’ या जयघोषाने संपूर्ण इचलकरंजी परिसर दुमदुमून गेला होता. अखंड… Continue reading इचलकरंजीतील शिवतीर्थाचे दिमाखात लोकार्पण

error: Content is protected !!