माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस कमिटीत उत्साहात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत उत्साहात साजरी करण्यात आली. प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अँड. गुलाबराव घोरपडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या घोटणे, संजय पोवार-वाईकर, बयाजी, शेळके किरण मेथे, किशोर… Continue reading माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस कमिटीत उत्साहात…

आजरा येथील अण्णा भाऊ सूतगिरणी पंचवार्षिक निवडणूक  बिनविरोध…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अशी माहिती आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि सुतगिरणीचे नवनिर्वाचित संचालक डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली. तसेच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले. राज्यातील सूतगिरणी अडचणीत असताना देखील संचालक मंडळाने काटकसर करून सुतगिरणीचे उत्पादन सुरु केले आहे. गिरणीचा… Continue reading आजरा येथील अण्णा भाऊ सूतगिरणी पंचवार्षिक निवडणूक  बिनविरोध…

मिणचे खुर्द येथील रस्त्याची दुरवस्था    

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द हे १५ ते २० गावे, वड्या-वस्त्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. गावातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. भुदरगड पंचायत समिती सभापती या गावच्या असून त्यांच्या गावातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. गावाची सुमारे ३ हजार लोकसंख्या असून राजकीय, शैक्षणिक दृष्टया जागरूक,  संवेदनशील गाव आहे. या खोऱ्यातील… Continue reading मिणचे खुर्द येथील रस्त्याची दुरवस्था    

अमल महाडिकांना निवडून आणण्याचा आवाडे गटाचा निर्धार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार माजी आ. अमल महाडिक यांना प्रचंड मताने निवडून आणूया, असा निर्धार व्यक्त करून आ.  प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिला. कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाडे गटाची बैठक ताराराणी पक्ष कार्यालयात आज (शुक्रवार) झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला… Continue reading अमल महाडिकांना निवडून आणण्याचा आवाडे गटाचा निर्धार

देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात शिरोली टोल नाक्यानजीक असलेल्या जुना जकात नाका पुलाजवळ देशी बनावटीचे पिस्टलसह जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना आज (शुक्रवार) सापळा लावून शहर डीवायएसपी विभाग आणि शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकऱणी विकी घोडीबा नाईक (वय ३१, रा. आमरोळी ता. चंदगड),  शुभम शांताराम शिंदे (वय २६, रा. अर्जुनवाडी ता. गडहिंग्लज ) असे अटक… Continue reading देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एसटी महामंडळाचे खासगीकरण ? ; अनिल परब म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील एसटी कामगारांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढू लागली आहे. यावर आता मार्ग काढण्यासाठी सरकारने विविध पर्यायावर विचार सुरू केला आहे. त्यातच एसटी महामंडळाचे खासगीकरण कऱणे, हा एक मुद्दा समोर आला आहे. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाष्य… Continue reading एसटी महामंडळाचे खासगीकरण ? ; अनिल परब म्हणतात…

पुनाळ येथे शिवसेनेतर्फे ‘ई-श्रम कार्ड’ महानोंदणी कार्यक्रम

कोतोली (प्रतिनिधी) : पुनाळ (ता.पन्हाळा) येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज (शुक्रवार) शिवसेनेच्या वतीने ई-श्रम कार्ड महानोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार नेहमीच ८० टक्के… Continue reading पुनाळ येथे शिवसेनेतर्फे ‘ई-श्रम कार्ड’ महानोंदणी कार्यक्रम

निंगुडगेमध्ये कार्तिकस्वामी दर्शन सोहळा उत्साहात…

आजरा (प्रतिनिधी) :  आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या अमृतेश्वर मंदिरातील कार्तिकस्वामी दर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अत्यंत दुर्मिळ असणारी कार्तिक स्वामींची मूर्ती फक्त निंगुडगे गावी आहे. कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रावर या मूर्तीचा दर्शनाचा लाभ होतो अशी… Continue reading निंगुडगेमध्ये कार्तिकस्वामी दर्शन सोहळा उत्साहात…

विजयासाठी आवश्यक मॅजिक फिगर सहज पार करू : ना. सतेज पाटील

आजरा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व तालुक्यांना गट-तट न पाहता भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच भागातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विजयासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर आपण सहज पार करू, असा विश्वास महाविकास आघाडीचे  उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला. ना. सतेज पाटील यांनी आजऱ्यातील मतदारांच्या… Continue reading विजयासाठी आवश्यक मॅजिक फिगर सहज पार करू : ना. सतेज पाटील

महावितरणची तत्परता : बांबवडेतील नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या बांबवडे शाखा कार्यालयाने बांबवडे गावातील २०० केव्हीए क्षमतेचे नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलून वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला. बुधवारी (दि.१७) सायंकाळी साडेपाच वाजता बांबवडे – पिशवी रोडवरील २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त झाले. त्यामुळे  बांबवडे गावातील घरगुती ५००, वाणिज्यिक २४७, औद्योगिक १२ अशा एकूण ७६१ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा… Continue reading महावितरणची तत्परता : बांबवडेतील नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलले

error: Content is protected !!