आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लॉकडाऊनचे संकेत  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात जेव्हा ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होत असल्याने सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही. त्यासाठी… Continue reading आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लॉकडाऊनचे संकेत  

अटलजींच्या जयंतीदिनी भाजपातर्फे सुशासन दिन उत्साहात  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर भाजपच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९७ वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेत सुशासन दिन साजरा करत अभिवादन करण्यात आले.  बिंदू चौक येथे लक्ष्मीपुरी मंडलाच्यावतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. पक्षाच्यावतीने शहरातील ७ मंडलात प्रमुख चौकामध्ये तर शक्ती केंद्र, बूथ स्तरावर जवळपास ११० ठिकाणी अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.… Continue reading अटलजींच्या जयंतीदिनी भाजपातर्फे सुशासन दिन उत्साहात  

कुरुंदवाडमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅली

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी कुरुंदवाड पालिका व लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार) शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. कृष्णाघाट स्मशनभूमी व नदी परिसराची स्वच्छता करून वृक्षारोपण करत अभियानाचा समारोप करण्यात आला. येथील पालिका चौकातूनन रॅलीला सुरवात झाली. नगराध्यक्ष दीपक गायकवाड, प्रांतपाल सुनील सुतार, नगरसेवक… Continue reading कुरुंदवाडमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅली

देशाचा विकास होण्यासाठी गावे सुधारा : सुधाहर पी

टोप (प्रतिनिधी) : गावे सुधारली, गावाचा विकास झाला, तरच राज्य, देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन बीपीसीएल गॅसचे प्रमुख सुधाहर पी यांनी केले. ते  वडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरण व शुशोभिकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, नॅचरल गॅस गावागावात तसेच शहरात पाईपलाईनने पोहोचवण्याचे काम सध्या सुरु आहे. या गॅसपासून नागरिकांना कोणताही धोका पोहोचणार नाही.… Continue reading देशाचा विकास होण्यासाठी गावे सुधारा : सुधाहर पी

कोल्हापुरातील शहाजी कॉलेजसमोरचा स्पीडब्रेकर बनतोय ॲक्सिडेंट स्पॉट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शहाजी कॉलेजसमोर असणारा स्पीडब्रेकर चुकीचे पध्दतीने तयार केल्याने अपघातांसाठी कारणीभूत ठरू लागला आहे. गेल्या चार दिवसांत या स्पीड ब्रेकरमुळे ४ अपघातांच्या गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर शहाजी कॉलेजच्यासमोर… Continue reading कोल्हापुरातील शहाजी कॉलेजसमोरचा स्पीडब्रेकर बनतोय ॲक्सिडेंट स्पॉट

बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेला जेरबंद  

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  बेकायदेशीर विनापरवाना घातक शस्त्रे (तलवारी) विक्री करण्यास आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातकणंगले – कुंभोज रोडवर सापळा लावून अटक केली. पियुष रामगोंडा पाटील (रा. कुंभोज ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या संशयित आरोपीच नांव असून त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक दुचाकी असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई… Continue reading बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेला जेरबंद  

अखेर कळेतील मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारभोगाव राज्य मार्गावरील पुनाळफाटा ते कुंभारवाडा या रस्त्यावरील सांडपाणी सिमेंटच्या पाईपद्वारे ओढ्याला काढण्याच्या कामाला  सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग,  ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार  घेतल्याने हे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.  गेल्या काही दिवसांपासून पुनाळफाटा ते कुंभारवाडा या रस्त्यावर गटारीतील सांडपाणी येवून ग्रामस्थ… Continue reading अखेर कळेतील मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी

आता राजकीय ताळेबंद कसा जमवायचा हेही कळाले : समरजितसिंह घाटगे

कागल  (प्रतिनिधी) :  ज्येष्ठ संचालक माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कामकाजाची प्रशंसा करताना ते सी. ए असल्यामुळे त्यांना कारखान्यांचा ताळेबंद चांगल्या पद्धतीने समजतो. याचाच संदर्भ देत घाटगे यांनी मला कारखान्याचा ताळेबंद तर कळतोच. परंतु आता या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय ताळेबंद कसा जमवायचा हेही कळाले आहे. अशी मिश्किल टिप्पणी  समरजितसिंह… Continue reading आता राजकीय ताळेबंद कसा जमवायचा हेही कळाले : समरजितसिंह घाटगे

एसटी कर्मचाऱ्यांना दरडावून नव्हे, तर समजावून सांगा : चंद्रकांत पाटील  

पुणे (प्रतिनिधी) : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडावून नव्हे, तर समजावून सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी आज (शनिवार) केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोईसुविधा द्यायलाच हव्यात,  अशीही मागणी त्यांनी केली. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या… Continue reading एसटी कर्मचाऱ्यांना दरडावून नव्हे, तर समजावून सांगा : चंद्रकांत पाटील  

पुन्हा भाजपच सत्तेवर येण्याचा अंदाज  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. तर समाजवादी पक्ष,  बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले आहे. मागील १० दिवसांमध्ये राज्यात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.… Continue reading पुन्हा भाजपच सत्तेवर येण्याचा अंदाज  

error: Content is protected !!