रांगोळी येथे विधवा महिलेस ध्वजारोहणाचा मान

रांगोळी (प्रतिनिधी) : ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत गावचावडी समोरील ध्वजारोहण भारतीय जवान तानाजी सूर्यवंशी यांच्या मातोश्री भारती मोहन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट अखेर सर्व घरांवर व शासकीय ठिकाणी तिरंगा ध्वज लावला जात आहे. रांगोळी गावचावडी समोरील ध्वजारोहणाचा मान तलाठी यांचा असतो,… Continue reading रांगोळी येथे विधवा महिलेस ध्वजारोहणाचा मान

माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यावर कारवाईची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळावर उपस्थित राहिलेल्या माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे पत्र त्यांनी तातडीने ठाकरे यांना पाठवले आहे. अलीकडेच प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने हे… Continue reading माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यावर कारवाईची मागणी

गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यासाठी मदतीचे आवाहन

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील मंदूर पैकी धुमाळवाडी येथील रवी विलास मार्गे (वय २४) या गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यावर कोल्हापुरातील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्याला समाजातून मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती, सामाजिक व विविध संस्थांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणच्या गगनबावडा उपविभागतील तिसंगी पैकी टेकवाडी येथे विद्युत लाईनवर… Continue reading गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यासाठी मदतीचे आवाहन

माणगावात तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत देणार : सरपंच मगदूम

कुंभोज (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त माणगाव ग्रा.पं. च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. माणगावातील प्रत्येक कुटुंबाला तिरंगा ध्वज व भारताच्या संविधानाची प्रत दिली जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली. दि. १४ व १५ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक सरपंच व उपसरपंच म्हणून विधवा महिलांची निवड करून त्यांच्या हस्ते ग्रा.पं. येथे  ध्वजारोहण करण्यात येणार… Continue reading माणगावात तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत देणार : सरपंच मगदूम

कागलमध्ये राष्ट्रवादीतर्फे तिरंगा ध्वजाचे वाटप

कागल (प्रतिनिधी) : कागल शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागरिकांना दोन हजार ध्वजांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, सुनील माने, सौरभ पाटील, शशिकांत नाईक, आनंदा परीट, भरत निंबाळकर आदी… Continue reading कागलमध्ये राष्ट्रवादीतर्फे तिरंगा ध्वजाचे वाटप

पन्हाळगडावर ३७५ फूट लांब तिरंग्याची रॅली

पन्हाळा (प्रतिनिधी) : देशासह राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) पन्हाळ्यावर कोल्हापूर हायकर्स आणि नगरपरिषदेच्या वतीने ३७५ फूट लांब तिरंगाची रॅली काढण्यात आली. ही रॅली बाजीप्रभू पुतळा ते छत्रपती शिवमंदिरपर्यंत घोषणा देत पार पडली. यावेळी अभिनेत्री सोनाली पाटील, कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील, उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार… Continue reading पन्हाळगडावर ३७५ फूट लांब तिरंग्याची रॅली

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत आज ध्वजारोहण सोहळा झाला. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी पॉलिटेक्निक, छत्रपती राजाराम हायस्कूल, वाय. बी. पाटील हायस्कूल, विद्यामंदिर, श्री गणेश विद्यालय यांच्यावतीने डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इमारतीवर सामूहिक ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी अधिष्ठाता व जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण

जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ

कुंभोज (प्रतिनिधी) : कानाकोपऱ्यात बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहेत. लवकरच घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. यासाठीची मूर्तीशाळांमध्ये लगबग सुरू आहे. मात्र, यंदा कच्चा मालावर जीएसटी आकारला जाणार असल्याने गणेशमूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. महाराष्ट्रासह कोकणात घरोघरी गणेशमूर्ती स्थापन करण्याची प्रथा आहे. यामुळे या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात हजारोंहून अधिक गणेशमूर्ती विक्री केंद्र आहेत.… Continue reading जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ

मुख्य शासकीय ध्‍वजारोहण समारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा ध्वजारोहण समारंभ सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.

बुबनाळ येथे विवाहतेला जबर मारहाण : महिला गंभीर जखमी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथे अंगणात वाळत घातलेली कपडे मोटरसायकलवर पडल्याच्या कारणावरून मुस्कान रफिक जमादार (रा. डिग्रज ता.मिरज) या विवाहितेला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याची फिर्याद रेश्मा नजीर निशाणदार (रा. बुबनाळ) यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. दरम्यान जखमी मुस्कान जमादार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले… Continue reading बुबनाळ येथे विवाहतेला जबर मारहाण : महिला गंभीर जखमी

error: Content is protected !!