कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुंभार समाजाच्या प्लॉट हस्तांतरण, कर्ज बोजा आदी विषयी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत, कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी लि. कोल्हापूर ही संस्था सन १९५७ साली स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेअंतर्गत नोंदणीकृत सभासदांना… Continue reading कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापुरात 26 नोव्हेंबर रोजी भव्य ‘डॉगशो’चे आयोजन….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केनेल क्लब ऑफ इंडियाच्यावतीने कोल्हापूरात 26 नोव्हेंबर रोजी डॉग शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये देशभरातून तब्बल 350 ते 400 स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर नामवंत जातीचे रुबाबदार श्वान पाहण्याची सुवर्णसंधी या शोच्या निमीत्ताने कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे. या शो मध्ये डॉबरमन, ग्रेट डेन, जर्मन शेफर्ड, सायबेरियन हस्की, गोल्डन रीट्रीवर, लॅब्राडोर,… Continue reading कोल्हापुरात 26 नोव्हेंबर रोजी भव्य ‘डॉगशो’चे आयोजन….

बिद्री लढतीत दोन्ही गटांची झाली चिन्ह निश्चिती; उद्यापासून प्रचाराची गती वाढणार..!

बिद्री ( प्रतिनिधी ) भोगावती साखरच्या तोफा थंडावल्या आणि आता दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुरंगी लढत सुरु झाली. आणि बिद्री पंचक्रोशीत राजकारणाच्या उलथा – पालथी सुरु झाल्या. त्यामुळं भोगावती खोरं शांत झालं आणि बिद्री खोऱ्यात निवडणूकीनं वातावरण बदलू लागलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुरंगी… Continue reading बिद्री लढतीत दोन्ही गटांची झाली चिन्ह निश्चिती; उद्यापासून प्रचाराची गती वाढणार..!

‘भोगावती साखर’ची मतमोजणी सुरु; निकालाची नेमकी स्थिती काय ?

भोगावती साखरची निवडणूक लागली अन् भोगावती खोऱ्यातील राजकीय वर्तूळात अनेक उलथा- पालथ झाल्या. मुख्य ऐनवेळी भोगावती साखरचे माजी चेअरमन धैर्यशिल पाटील कौलवकर यांनी आपलं वेगळं पॅनल उभा केलं अन् घडामोंडींना वेग आला. या तोफा 19 नोव्हेंबर रोजी मतदान झालं अन् तोफा थंडावल्या. यानंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे ते गुलाल कोणाचा याकडे. आज सकाळपासून मतमोजणी… Continue reading ‘भोगावती साखर’ची मतमोजणी सुरु; निकालाची नेमकी स्थिती काय ?

ऊस हंगाम सुरू करण्याबाबत पाच कारखानदारांनी घेतली पालकमंत्र्यांकडे धाव

कुरुंदवाड प्रतिनिधी ( कुलदीप कुंभार ) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील शेतकरी संघटनेच्या चारशे रुपयाच्या मागणीबाबत शेतकरी संघटनांचे सहा प्रतिनिधी कारखान्याचे सहा प्रतिनिधी, प्रादेशिक साखर संचालक, लेखापरीक्षक (साखर) व इतर अधिकारी यांच्या समितीची संयुक्त बैठक घ्यावी असे निर्देश दिले होते, याचाच भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. संचालकांनी दिलेल्या नमुन्यामध्ये सर्व… Continue reading ऊस हंगाम सुरू करण्याबाबत पाच कारखानदारांनी घेतली पालकमंत्र्यांकडे धाव

‘निसर्गछाया’ उपक्रमामुळे ज्येष्ठ पुणेकरात निसर्गाचा गोडवा वाढेल- चंद्रकांत पाटील  

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी सपत्नीक ‘निसर्गछाया’ या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाचा गोडवा अनुभवाला. चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना म्हटले आहे कि, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शहरी झगमगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात नयनरम्य ठिकाणी काही काळ व्यतीत करावा असं प्रत्येक ज्येष्ठ पुणेकर नागरिकांना वाटत असतं. परंतु… Continue reading ‘निसर्गछाया’ उपक्रमामुळे ज्येष्ठ पुणेकरात निसर्गाचा गोडवा वाढेल- चंद्रकांत पाटील  

चंद्रकांत पाटील यांनी छट पूजनात सहभाग घेत दिल्या शुभेच्छा

पुणे ( प्रतिनिधी ) उत्तर भारतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला साजरा होणार सर्वात मोठा सण म्हणजे छट पूजा ! आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे संक्रांतीला सूर्याची उपासना करतात त्याचप्रमाणे उत्तर भारतात दिवाळीनंतर छट पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना केली जाते. स्त्रिया निर्जल उपवास करून सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून या पूजेची… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी छट पूजनात सहभाग घेत दिल्या शुभेच्छा

आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी ( पंढरपूर ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते सायं.9 पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर 21 नोव्हेंबर… Continue reading आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

राज्यातील सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीतून बाहेर याव्यात याकरीता कटिबद्ध- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) वस्त्रोद्योग क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काळ मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यत: सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून प्रतिचाती रु. 5 हजार प्रमाणे 5 वर्षांसाठी घेणाऱ्या मध्यम मुदती कर्जावर (दोन वर्षाच्या मोराटोरिअम कालावधीसह) कमाल 12 % पर्यंतचे… Continue reading राज्यातील सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीतून बाहेर याव्यात याकरीता कटिबद्ध- मंत्री चंद्रकांत पाटील

कोथरूडकरांच्या मनोरंजनासाठी “एका लग्नाची, पुढची गोष्ट” चा प्रयोग मोफत

पुणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे आणि पुण्यातील कोथरूड परिसर म्हणजे कलाकारांचे महेर घर म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अनेक कलाकार, रसिक, लेखक, साहित्यिक या परिसरात राहतात. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून कोथरुडकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच सांस्कृतिक मेजवानी मिळत असते. बुधवार, दि 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 4… Continue reading कोथरूडकरांच्या मनोरंजनासाठी “एका लग्नाची, पुढची गोष्ट” चा प्रयोग मोफत

error: Content is protected !!