माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (शनिवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भरत गावित यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. माणिकराव गावित यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल… Continue reading माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

नागपूर (वृत्तसंस्था) : दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या दरम्यान,… Continue reading संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

उत्रे येथील तरुणास पोस्कोंतर्गत अटक

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील सचिन अरुण पाटील याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  याबाबत पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या (पोस्को) अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी सचिन पाटील यास ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी… Continue reading उत्रे येथील तरुणास पोस्कोंतर्गत अटक

आसुर्ले येथे एकावर जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील बाबासाहेब गणपती पाटील याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व नागरी हक्क संरक्षण कायदा (ॲट्रॉसीटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. गावातील राजू दिनकर चावरेकर याच्या टेम्पोमधून कामावर जानाऱ्या महिला प्रवास करीत असतात. अन्य महिलांना टेम्पोमध्ये बसण्याकरिता टेम्पो आसुर्ले येथील रस्त्यावर थांबवला असता यातील आरोपी बाबासाहेब… Continue reading आसुर्ले येथे एकावर जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा

सात दशकानंतर आठ चित्ते भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त… Continue reading सात दशकानंतर आठ चित्ते भारतात दाखल

जितेंद्र आव्हाड यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दणका

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतले सर्व शासन निर्णय रद्द करून त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा धक्का दिला आहे. गृहनिर्माण क्षेत्राशी निगडित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे पुन्हा म्हाडा आणि विभागीय मंडळांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर सत्तेवर… Continue reading जितेंद्र आव्हाड यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दणका

‘स्तुति’च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे दोन शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्यांनी सहभागींना अतिशय उपयोगी असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांविषयी सविस्तर माहिती दिली. पहिल्या सत्रात डॉ. सी. गोपीनाथ यांनी फोटो ‘इलेक्ट्रॉन एमिशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. संजय चव्हाण यांनी डॉ. गोपीनाथ यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या… Continue reading ‘स्तुति’च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

निर्यात वाढवा, आयात कमी करा : नारायण राणे 

मुंबई  (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म, लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकीकरण हे स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक अहवालाचे… Continue reading निर्यात वाढवा, आयात कमी करा : नारायण राणे 

गौतम अदानी जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट या दोन कुटुंबामध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, शुक्रवारी गौतम अदानी यांनी अर्नाल्टला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. कधी अदानी पुढे जात आहे, तर कधी बर्नार्ड अर्नाल्ट अशी जोरदार स्पर्धा या दोन्ही उद्योगपतीमध्ये पाहायला मिळत… Continue reading गौतम अदानी जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती

सूर्यवंशीवाडी-येळावी येथे ५.५० लाखांची वीज चोरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  सांगली जिल्ह्यातील सूर्यवंशीवाडी, येळावी (ता. तासगाव) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकाची वीज चोरी महावितरणने पकडली आहे. या ग्राहकाने वीज मीटर बायपास करून थेट जोडणीद्वारे वीज वापर करीत ३९ हजार ७८८ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे ५ लाख ५० हजार रुपयांची वीज चोरी केली. या प्रकरणी महावितरणने वीज वापरकर्ते अनिकेत जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याविरूध्द वीज… Continue reading सूर्यवंशीवाडी-येळावी येथे ५.५० लाखांची वीज चोरी

error: Content is protected !!