निर्यातीसाठी ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन’ समिती स्थापना : खा. संजय मंडलिक

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : संसदेच्या चालू अधिवेशन काळात विदेश व्यापार महानिर्देशयालयाच्या अधिकाऱ्यांशी वाणिज्य मंत्रालयामध्ये खा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा ‘एक्सपोर्ट हब’ व्हावा याकरीता ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी (डिएलईपीसी) ची स्थापना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विदेश व्यापार महानिर्देशयालयाशी संलग्न ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटीची स्थापना करण्यासाठी खा. संजय मंडलिक… Continue reading निर्यातीसाठी ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन’ समिती स्थापना : खा. संजय मंडलिक

मंदिर नाही उघडले तर अंबाबाईच्या दर्शनासाठी ‘अशी’ असणार सोय (व्हिडिओ)

मंदिर नाही उघडले तर अंबाबाईच्या दर्शनासाठी विशेष सोय करणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

कोल्हापूरमध्ये भाजपतर्फे छ. शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीबीआय कोर्टात आज बाबरी मस्जिद खटल्याचा ऐतिहासिक निकाल लागला. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या येथे हजारो कारसेवकांनी बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडला होता. आज (बुधवार) लखनऊ येथे सीबीआय कोर्टात ४९ पैकी हायात असणाऱ्या ३२ आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. विनय कटियार, धर्मादास, पवन कुमार पांडे, चंपतराय, लल्लू सिंग आज निकाला दरम्यान कोर्टात… Continue reading कोल्हापूरमध्ये भाजपतर्फे छ. शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव…

सीपीआर, आयजीएम, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लजसाठी स्वतंत्र समिती नियुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील आग प्रतिबंधात्मक आणि विद्युत पुरवठा यंत्रणेचे ऑडीट करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत. समित्यांकडून केलेल्या ऑडीटचा अहवाल सात दिवसात सादर करावा, असा आदेश असे जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.  सीपीआरसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक… Continue reading सीपीआर, आयजीएम, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लजसाठी स्वतंत्र समिती नियुक्त…

सकल मराठा समाजातर्फे ४ ऑक्टोबरला न्यायिक परिषद : प्रा. जयंत पाटील (व्हिडिओ)

मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला सकल मराठा समाजातर्फे न्यायिक परिषद.  

कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व… Continue reading कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती कार्यक्रम

भास्करराव जाधव वाचनालयासाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने वस्तू प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या मुक्त सैनिक वसाहत येथे सुरु होणाऱ्या भास्करराव जाधव वाचनालय संचलित ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने ६ स्टडी टेबल्स आणि २५ खुर्च्या हस्तांतरीत करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन रोटरी क्लब सनराईजच्यावतीने लोकसहभाग नोंदविला असून यापुढेही शहरातील दानशूर व्यक्ति आणि संस्थांनी ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी अधिकाअधिक मदत… Continue reading भास्करराव जाधव वाचनालयासाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने वस्तू प्रदान

आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सायकलवरुन गाठले महापालिका कार्यालय…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  यांनी आज (बुधवार) चक्क सायकलवरुन थेट महापालिकेत प्रवेश केला. निमित्त होते नो व्हेईकल डे चे…  महानगरपालिकेत प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आज सप्टेंबर महिन्याचा अखेरचा दिवस असल्याने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेमध्ये होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीला सायकल प्रवास करुन… Continue reading आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सायकलवरुन गाठले महापालिका कार्यालय…

‘यांच्याकडून’ सानेगुरुजी येथील कोविड सेंटरला आवश्यक वस्तू प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सानेगुरुजी येथे उपनगरातील लोकांसाठी मैत्रांगण अपार्टमेंट येथे नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. विविध संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाला मदतीसाठी ओघ वाढला असल्याचे दिसून येत आहे. आज (बुधवार) अमृत चित्रकार, अमोल पाटणे त्यांचेकडून ६ स्पीकर्स, १ एंपलीफायर, १ माईक देण्यात आले. कै. गो. स. न्हिवेकर फौडेशन कोल्हापूर यांच्याकडून… Continue reading ‘यांच्याकडून’ सानेगुरुजी येथील कोविड सेंटरला आवश्यक वस्तू प्रदान

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ उपक्रम आता मुंबईतही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली मास्क नाही तर प्रवेश नाही आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम ‘बेस्ट’ ने मुंबईत राबविण्यास सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी देसाई यांनी’ मास्क… Continue reading ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ उपक्रम आता मुंबईतही

error: Content is protected !!