अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण

गडहिंग्लज (चैतन्य तंबद) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या. मात्र युजीसीने (UGC) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे बंधनकारक राहील असे सांगितले. या सर्व गोंधळात भरडले जात होते ते म्हणजे अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे आदेश दिले… Continue reading अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण

ऊर्जामंत्र्यांकडून व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या तक्रारीची दखल घेत २४ तासात बदलले रोहीत्र

मुंबई (प्रतिनिधी) : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे आलेल्या रोहीत्र नादुरस्त असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर डॉ. राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन केवळ २४ तासात नवीन रोहीत्र बसवून गावकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. संगमनेर विभागाच्या आचवी शाखे अंतर्गत येणाऱ्या शिबलापूर गावातील रोहीत्र तांत्रिक बिघाडामुळे दि. २७ सप्टेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास नादुरस्त पडले. रब्बी… Continue reading ऊर्जामंत्र्यांकडून व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या तक्रारीची दखल घेत २४ तासात बदलले रोहीत्र

कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्वपूर्ण : आदिती तटकरे

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक असून त्यासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यटन, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क, उद्योग व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज तसेच राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा शुभारंभ आदिती तटकरे यांच्या हस्ते माहितीपत्रक आणि मास्क… Continue reading कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्वपूर्ण : आदिती तटकरे

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्या (शुक्रवार दि २ ऑक्टोबर) रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.  कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस आणि चिकन विक्रेत्यांनी नोंद घेऊन  दुकाने बंद असणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधीत दुकान मालकावर कडक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ४५२ जण कोरोनाबाधित : तर ७६७ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४५२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ७६७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ४५२ जण कोरोनाबाधित : तर ७६७ जण कोरोनामुक्त

पुलाची शिरोली येथे आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्र मंजूर व्हावे : शशिकांत खवरे

टोप (प्रतिनिधी) : पुलाची शिरोली गावातील वाढती लोकसंख्या पहाता ग्रामीण रुग्णालय तसे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्र मंजूर व्हावे. अशी मागणी शिरोली सरपंच शशिकांत खवरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज (बुधवार) आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिरोली गावातील वाढती लोकसंख्या तसेच याठिकाणी असणारी औद्योगिक वसाहतीमुळे हजारो नागरीक याठिकाणी वास्तव्यास येत आहेत. यामुळे गावची लोकसंख्या… Continue reading पुलाची शिरोली येथे आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्र मंजूर व्हावे : शशिकांत खवरे

माझी बदनामी करण्यासाठीच आरोपांचे षडयंत्र : डॉ. कौस्तुभ वाईकर (व्हिडिओ)

‘लाईव्ह मराठी’ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत डॉ. कौस्तुभ वाईकर आपल्यावरील विविध आरोपांचे खंडन करत हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.  

‘या’ अटींवर पाच ऑक्टोंबरपासून राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक- ५ चे नियम आज जाहीर केले आहेत.  रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी… Continue reading ‘या’ अटींवर पाच ऑक्टोंबरपासून राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…

कोल्हापूर (सुजाता पोवार) : संपूर्ण मानवजात जिच्यावर अवलंबून आहे, तीच ‘स्त्री’ आजही असुरक्षितच आहे. आपण तंत्रज्ञानात, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षणात दिवसेंदिवस प्रगती करत आहोत. पण एक माणूस म्हणून आपण खरंच प्रगत आहोत का..? रोज सकाळच्या चहासोबत आपण स्त्रियांवरील अत्याचाराच्या,बलात्काराच्या घटना ऐकतोय, पाहतोय, वाचतोय आणि, ‘काय व्हायचं या देशाचं..?’, असं म्हणून एक निश्वास सोडतोय. इथंच एक नागरिक… Continue reading स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…

ऊस परिषद होणारच ! : राजू शेट्टी (व्हिडिओ)

यंदाची ऊस परिषद होणारच आणि आम्ही जो निर्णय घेऊ तो कारखानदार, सरकारला मान्य करावा लागेल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  

error: Content is protected !!