दिलासा नाहीच : अर्णब गोस्वामींचा तुरूंगातील मुक्काम वाढला

मुंबई (प्रतिनिधी) : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले  रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह सहआरोपी नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज  उच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढणार आहे.   अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.… Continue reading दिलासा नाहीच : अर्णब गोस्वामींचा तुरूंगातील मुक्काम वाढला

…तर मच्छीमारांचं मुलाबाळांसह आंदोलन : प्रा. एकनाथ काटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षी महापुरात मच्छीमारांचं मोठे नुकसान झाले. त्याच्या भरपाईची रक्कम मत्स्य कार्यालयाकडून देय आहे. ती दिवाळीपर्यंत मिळावी, अन्यथा नुकसानग्रस्त मच्छीमार आपल्या मुला-बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाचे जनरल सेक्रेटरी प्रा. एकनाथ काटकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, २०१९ मध्ये आलेल्या… Continue reading …तर मच्छीमारांचं मुलाबाळांसह आंदोलन : प्रा. एकनाथ काटकर

…म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनामुळे दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिवाळीत पवारांना भेटता येणार नाही. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक… Continue reading …म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

दीपावली विशेष : कोल्हापूरकराने बनवलेले ‘हे’ आकाशकंदील थक्क करणारे… (व्हिडिओ)

आजपर्यंत आपण अनेक डिझाईन्सचे आकाशकंदील पाहिले असतील. पण कोल्हापुरातल्या एका व्यक्तीने तयार केलेले आकाशकंदील थक्क करणारे आहेत. काय आहे याचे वैशिष्ट्य, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

मनपाच्या ‘या’ परिपत्रकामुळे मुंबईकरांची दिवाळी यंदा शांत, शांतच…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हाच कित्ता आता मुंबई महापालिकेनेही गिरवायचा ठरवलं आहे. मुंबई महापालिकेने आज (सोमवार) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईकरांना दिवाळीच्या काळात केवळ लक्ष्मीपूजनादिवशीच सौम्य स्वरूपाचे फटाके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्य दिवस फटाके फोडण्यावर बंदी असेल, यामुळे यंदा दिवाळीतील बालचमूंच्या, तरुणांच्या उत्साहावर विरजण पडणार… Continue reading मनपाच्या ‘या’ परिपत्रकामुळे मुंबईकरांची दिवाळी यंदा शांत, शांतच…

दीपावली विशेष : ‘त्यांनी’ वर्षानुवर्षं जपली चविष्ट फराळ बनविण्याची परंपरा… (व्हिडिओ)

कोल्हापूरच्या ‘या’ तिघी भगिनींनी वर्षानुवर्षं जपलीय खमंग आणि चविष्ट फराळाची परंपरा… पहा दिवाळीनिमित्त ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

‘या’ मागण्यांसाठी अंकुश संघटनेतर्फे ठिय्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामात ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांआत एकरकमी एफआरपी द्यावी, पाच टक्के मोळी बांधणी वजावट रद्द करावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंकुश सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देवून आंदोलनाची सांगता केली. मशीनने ऊस तोडणी केल्यानंतर मोळी वजावटपोटी पाच टक्के कारखान्यांकडून कपात केली जात… Continue reading ‘या’ मागण्यांसाठी अंकुश संघटनेतर्फे ठिय्या

ठाकरे सरकारला जबाबदार धरत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) : थकीत पगार न मिळाल्याने  एका एस.टी कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेत  आपली जीवनयात्रा आज (सोमवार) संपवली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावात घडली आहे.  यामुळे जळगावसह एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मनोज चौधरी असे आत्महत्या केलेल्या  एस.टी कंडक्टरचे नांव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. एसटी महामंडळातील कमी… Continue reading ठाकरे सरकारला जबाबदार धरत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

ब्राह्मण समाजाबाबतच्या विधानावर एकनाथ खडसेंचा माफीनामा..!  

मुंबई (प्रतिनिधी) : ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे.  माझ्या विधानाच्या झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी  ट्विट करत म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यव्यावरुन… Continue reading ब्राह्मण समाजाबाबतच्या विधानावर एकनाथ खडसेंचा माफीनामा..!  

बिंदू चौकात लोक जनशक्ती पार्टीतर्फे वीज बिलांची होळी

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. यातच महावितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची भर पडली आहे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल इतर राज्यांनी माफ केलेली आहेत.  महाराष्ट्र सरकार संपूर्णपणे वीज बिल माफ करण्यासाठी चालढकल करत आहे. याचा निषेध करत आज (सोमवार) ऐतिहासिक बिंदू चौक येथे… Continue reading बिंदू चौकात लोक जनशक्ती पार्टीतर्फे वीज बिलांची होळी

error: Content is protected !!