गगनबावड्यातील असंडोलीचे दामाजी पाटील भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

साळवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागातर्फे भात पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील दामाजी बाळकृष्ण पाटील यांचा भात पिकामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. तर दुसरा क्रमांक शंकर गणपत पाटील (रा. सडोली खा.), तिसरा क्रमांक वसंत कुंभार (रा. वाळवेकर वाडी ता. पन्हाळा) चौथा… Continue reading गगनबावड्यातील असंडोलीचे दामाजी पाटील भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

शिवसेनेकडून दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्यास ‘कोल्हापुरी’ प्रसाद (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात आणि शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ आज (शनिवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आलीत. यावेळी रावसाहेब दानवे हे वारंवार शेतकरी विरोधात खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करतात याबद्दल त्यांच्या… Continue reading शिवसेनेकडून दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्यास ‘कोल्हापुरी’ प्रसाद (व्हिडिओ)

पवार साहेबांचा वाढदिवस… अन् मुश्रीफांच्या डोळ्यात आले अश्रू (व्हिडिओ)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ‘ही’ आठवण सांगताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू आले.

जर परत असे काही घडले तर यापेक्षा उग्र आंदोलन करू : दिलीप माने (व्हिडिओ)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशातील बळीराजा आक्रमक बनला असल्यामुळे रस्त्यावर उतरला आहे. आणि अश्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द वापरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज शिवसेनेच्या वतीने दसरा चौक येथे रावसाहेब दानवे यांची प्रतिमा असलेल्या… Continue reading जर परत असे काही घडले तर यापेक्षा उग्र आंदोलन करू : दिलीप माने (व्हिडिओ)

‘हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला मनापासून शुभेच्छा!’; अजित पवारांनी दिल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (शनिवार) ८० वा वाढदिवस आहे. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर अजित… Continue reading ‘हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला मनापासून शुभेच्छा!’; अजित पवारांनी दिल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  

कोल्हापुरातील ‘या’ गावात बोकडाची दहशत..(व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मागील काही दिवसांपासून गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात एका बोकडाचे दहशत माजवली आहे. गावात रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना तसेच मोटारसायकल चालवणाऱ्यांना हे बोकड मागून धडक मारत असल्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या बोकडापासून सावधान रहा, असे फलक गावातल्या चौकात लावण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मी देवाचा बोकड गावातील लोकांनानाहक त्रास देत आहे. गाडीचालक दिसला की तो… Continue reading कोल्हापुरातील ‘या’ गावात बोकडाची दहशत..(व्हिडिओ)

‘द डर्टी पिक्चर’मधल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावले. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी… Continue reading ‘द डर्टी पिक्चर’मधल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १७वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल… Continue reading शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

थेट पाईपलाईनचे भूमिपूजन आम्ही केलंय, उद्घाटनही आम्हीच करू ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

थेट पाईपलाईन योजनेचे भूमिपूजन आम्हीच केलंय, उद्घाटनही आम्हीच करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी बेकर गल्ली, सदर बाजार परिसरातील रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केला.  

जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायती मध्ये २०२०-२५ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी मंगळवार, १५ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार होती. परंतु, आता ही सोडत ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर होणार आहे,… Continue reading जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर : जिल्हाधिकारी

error: Content is protected !!