मनमोहनसिंग, मोदी कसे झाले पंतप्रधान ? : प्रणव मुखर्जींचा मोठा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्रात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आत्मचरित्राच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने नुकतेच केले. यात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या दोन्ही पंतप्रधानांची तुलना केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवले, तर मनमोहन सिंग यांना ते देण्यात आले होते, असा  उल्लेख… Continue reading मनमोहनसिंग, मोदी कसे झाले पंतप्रधान ? : प्रणव मुखर्जींचा मोठा खुलासा

भारतीय संघराज्य मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव : डॉ. गणेश देवी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ घोषणा ऐकायला मिळत आहे. म्हणजेच संघराज्य मोडून हुकूमशाही आणण्याचा केंद्राचा डाव आहे. त्यामुळे नागरिकांना दक्ष राहावे लागणार आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहीलेले सविधान मोडून लोकशाही गाडून सर्व सत्ता आपल्याच हातात केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक व सावध राहावे, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री… Continue reading भारतीय संघराज्य मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव : डॉ. गणेश देवी

वर्दी बाजूला ठेवा, मग दाखवू… : मनसेचे पोलिसांना आव्हान   

मुंबई (प्रतिनिधी) : पोलिसांनी सत्तेची दलाली करू नये. एवढीच हिंमत असेल तर दोन तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी वन बाय वन भिडा. तेव्हा आम्ही दाखवतो की महाराष्ट्र सैनिक काय असतो, अशा शब्दांत एक व्हिडिओ शेअर करत  मनसे नेते संदीप देशपांडे  यांनी पोलिसांना जाहीर आव्हान दिले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  वसईमध्ये परिवहन… Continue reading वर्दी बाजूला ठेवा, मग दाखवू… : मनसेचे पोलिसांना आव्हान   

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी शिवसेनेतर्फे सत्कार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे शुक्रवार (दि.८) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. राजेश क्षीरसागर म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता… Continue reading नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी शिवसेनेतर्फे सत्कार : राजेश क्षीरसागर

यड्रावमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ (व्हिडिओ)…

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  यड्रावमध्ये महाविकास आघाडीने प्रचाराला आज (मंगळवार) शुभारंभ केला. शिरोळ तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन मिळालेली यड्रावची ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. यावेळी पारंपारिक वाद्याच्या गजरात गावातील सर्व धार्मिक स्थळे आणि ग्रामदेवतांचे उमेदवारांनी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.   यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सतेंद्रराजे नाईक- निंबाळकर, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, महावीर पाटील, सरदार सुतार, शिवाजी… Continue reading यड्रावमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ (व्हिडिओ)…

पंचगंगा प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका… : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी आज (मंगळवार) पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जिल्ह्यातील नेते… Continue reading पंचगंगा प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका… : मुख्यमंत्री

जिल्ह्यात दिवसभरात २० जण कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४०५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर – ९, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे.… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात २० जण कोरोनामुक्त…

सुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवरून वाद : चौकशीअंती कारवाईचे प्रशासनाचे संकेत

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील प्राथमिक आरोग्य पथकाद्वारे आसपासच्या गावांना आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जातात. पण नोव्हेंबर २०१९ पासून येथे काम करणारे वैद्यकीय अधिकारी दीपक चंद्रशेखर बळवतकर यांच्या कार्यपद्धतीवरून तेथील कर्मचारी व परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. कर्मचाऱ्यांनी याबाबतची तक्रार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागांना दिली आहे. त्यानुसार, आज जिल्हा आरोग्य अधिकारी… Continue reading सुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवरून वाद : चौकशीअंती कारवाईचे प्रशासनाचे संकेत

देशभरातील कोरोना लसीकरणाची तारीख ठरली..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे संक्रमण वाढत आहे. प्रतिबंधक लस तयार करण्यात देशातील कंपन्यांना यश आले आहे, त्यामुळे देशभरात लसीकरण सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता १३ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश… Continue reading देशभरातील कोरोना लसीकरणाची तारीख ठरली..?

महापालिका निवडणूक : महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच लढत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. नेतेही सक्रिय झाले आहेत. भाजपने निवडणुकीसाठीची टीम जाहीर केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्त्वात भाजप कोल्हापूर मनपाची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज… Continue reading महापालिका निवडणूक : महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच लढत…

error: Content is protected !!