वीर शिवा काशीद स्मारक सुशोभिकरणासाठी ५० लाख मंजूर…

पन्हाळा (प्रतिनिधी) : वीर शिवा काशीद यांच्या स्मारक सुशोभिकरणासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचे पत्र आज (सोमवार) नियोजन आयोगाला देण्यात आले. पन्हाळा येथील बुधवार पेठेमध्ये असणाऱ्या वीर शिवा काशिद स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी आम. सदाभाऊ खोत यांच्या फंडातून पंचवीस लाख आणि आम. गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. याचे पत्र नियोजन… Continue reading वीर शिवा काशीद स्मारक सुशोभिकरणासाठी ५० लाख मंजूर…

जिल्ह्यातील चिकन, मटण सेंटरचे निर्जंतुकीकरण करा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बर्ड फ्लू रोगाचा प्रसार होत असल्याने शहर आणि जिल्हयातील चिकन, मटण सेंटर चालकांनी रोज निर्जंतुकीकरण करावे, बाधित भागातील कोंबड्या आणू नये, अशी सूचना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, विविध राज्यात बर्ड फ्लू आजाराचा संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर… Continue reading जिल्ह्यातील चिकन, मटण सेंटरचे निर्जंतुकीकरण करा…

इचलकरंजी नगरपालिकेसमोर दिव्यांगांचे चक्री उपोषण…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : दिव्यांगांना मागील वर्षातील ५ टक्के निधी, कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातील सानुग्रह अनुदान, दिव्यांग उन्नती अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ,५ टक्के राखीव गाळे याबाबत कोणतीच कार्यवाही अद्याप  करण्यात आली नाही. या प्रलंबीत मागण्यांसाठी आज (सोमवार) सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेसमोर चक्री उपोषण करण्यात आले. या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी सातत्याने विविध आंदोलने आणि निवेदन… Continue reading इचलकरंजी नगरपालिकेसमोर दिव्यांगांचे चक्री उपोषण…

कचरा डेपो कृती समितीचे इचलकरंजी पालिकेसमोर धरणे आंदोलन…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सांगली नाका परिसरातील कचरा डेपो तातडीने हटवावा आणि डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे होणारे प्रदूषण रोखावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज (सोमवार) सांगली नाका कचरा डेपो कृती समितीच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. सांगली नाका परिसरात असणाऱ्या कचरा डेपोला वारंवार… Continue reading कचरा डेपो कृती समितीचे इचलकरंजी पालिकेसमोर धरणे आंदोलन…

चिकन, मटण सेंटरचे निर्जंतुकीकरण करा : डॉ. वाय. ए. पठाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रसार होत असल्याने शहर आणि जिल्हयातील चिकन, मटण सेंटर चालकांनी रोज निर्जंतूकीकरण करावे, बाधीत भागातील कोंबड्या आणू नयेत. अशा सूचना जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.I डॉ. पठाण म्हणाले की, विविध राज्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होत आहे. या… Continue reading चिकन, मटण सेंटरचे निर्जंतुकीकरण करा : डॉ. वाय. ए. पठाण

‘घाटगे पाटील’मधील सहा हजार किलो वेस्टेज चोरीस…

करवीर (प्रतिनिधी) : उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड या युनिटमध्ये सुमारे एक लाख ९२ हजार रुपये किमतीच्या स्क्रॅप मालाची चोरी झाली असून हे सुमारे ६००० किलोचे चिपिंग (वेस्टेज मटेरियल) आहे. याबाबत घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे सुरक्षा अधिकारी श्रीराम सदाशिव कोडगुले (रा. फुलेवाडी, ता.करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्यादी दाखल केली आहे.   फिर्यादीत म्हटले… Continue reading ‘घाटगे पाटील’मधील सहा हजार किलो वेस्टेज चोरीस…

छ. शिवरायांनी जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली..! : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे शिवराज्याभिषेक म्हणून ओळखला जाणारा हा दिवस यापुढे ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून  साजरा केला जाईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर केलेल्या शासन निर्णयाबद्दल मुश्रीफ यांचा सत्कार कागल येथील… Continue reading छ. शिवरायांनी जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली..! : ना. हसन मुश्रीफ

श्री विठ्ठलाच्या दर्शनाबाबत २० जानेवारीपासून ‘मोठा’ बदल   

पंढरपूर  (प्रतिनिधी) : पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना २० जानेवारीपासून ऑनलाइन पासशिवाय श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज (सोमवार) येथे सांगितले.   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भाविकांना विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध करून देताना करावयाच्या उपाययोजना यावर… Continue reading श्री विठ्ठलाच्या दर्शनाबाबत २० जानेवारीपासून ‘मोठा’ बदल   

गटर, कचराप्रश्नी नगरसेवकांना महापालिकेत का यावे लागते ? : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘समृध्द कोल्हापूर’च्या निर्माणसाठी महापालिकेचा आरोग्य घनकचरा विभाग सक्षम पाहिजे. तुंबलेली गटर व साचलेला कचरा या प्रश्नावर नगरसेवकांना महापालिकेत का यावे लागते, असा सवाल आ. चंद्रकांत जाधव यांनी केला. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने कामाचे सूक्ष्म नियोजन केल्यास आपले कोल्हापूर कायमस्वरूपी ‘स्वच्छ व सुंदर’ राहील असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी… Continue reading गटर, कचराप्रश्नी नगरसेवकांना महापालिकेत का यावे लागते ? : आ. चंद्रकांत जाधव

शहराच्या विकासात अधिकाऱ्यांनी राजकरण करू नये : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेची मंजुरी नसताना निवडणुकीच्या धर्तीवर नागरिकांना आमिष दाखविण्यासाठी विकासकामे सुरु आहेत. घरफाळा विभागातील भ्रष्टाचार, घरफाळा थकीत असताना बांधकामास परवानगी दिली जाते, योजनेतून मंजूर झालेल्या निधी वाटपात शहरातील प्रत्येक प्रभागास समप्रमाणात न्याय दिला जात नाही. अधिकाऱ्यांनी राजकरण करू नये,  शहराचा विकास साध्य करायचा असल्यास सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. मनमानी कारभार करून महानगरपालिका… Continue reading शहराच्या विकासात अधिकाऱ्यांनी राजकरण करू नये : राजेश क्षीरसागर

error: Content is protected !!