आळते येथील कोळेकर कुटुंबीयांकडून नवजात नातींचं अनोख्या पद्धतीने स्वागत… (व्हिडिओ)

निपाणी येथील शुभांगी व सूरज वाघमोडे या दाम्पत्यास बालिका दिनादिवशी दोन कन्यारत्न प्राप्त झाले. हातकणंगले तालुक्यातील आळते या शुभांगी यांच्या माहेरगावी कोळेकर कुटुंबीयांनी आपल्या नातींचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.  

पन्हाळा गडावरील वास्तू खुल्या करा : आ. गोपीचंद पडळकरांना निवेदन   

पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळा हे थंड हवेची ठिकाण आहे. पन्हाळा गड पाहण्यासाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. पण गडावरील तीन ऐतिहासिक इमारती अद्यापही बंद अवस्थेमध्ये आहेत. ही स्थळे लवकरात लवकर सुरू करावीत, अशा मागणीचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना आज (मंगळवार) येथे देण्यात आले. पन्हाळा गडावर पडळकर आले असता त्यांनी पर्यटन वाढीसाठी… Continue reading पन्हाळा गडावरील वास्तू खुल्या करा : आ. गोपीचंद पडळकरांना निवेदन   

गडहिंग्लजमधील घरफाळा माफ करा : मनसे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरातील सर्व नागरिकांचा घरफाळा सरसकट माफ करावा. तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील सर्व गाळेधारकांचे बंद काळातील सहा महिन्याचे भाडे पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर यांच्याकडे करण्यात आली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सर्व लोकांचे आर्थिक स्त्रोत बंद झाल्यामुळे सर्वजण मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.… Continue reading गडहिंग्लजमधील घरफाळा माफ करा : मनसे

…तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार : शेतकऱ्यांचा निर्धार कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र, शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचा कोणताही फायदा होणार नसून आंदोलन बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही आमचा संघर्ष सुरुच ठेवणार अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. संसदेत कायदे मागे घेतले जात… Continue reading …तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार : शेतकऱ्यांचा निर्धार कायम

दिल्लीत शरद पवार- आशिष शेलार यांच्यात खलबते ; चर्चांना उधाण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी आज (मंगळवार) भेट घेतली. शेलार यांनी अचानकपणे पवारांची तेही दिल्लीत भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याभेटीवर  उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी भेट घेऊन अर्ध्या तास मराठा… Continue reading दिल्लीत शरद पवार- आशिष शेलार यांच्यात खलबते ; चर्चांना उधाण

व्यापक कटाचा संशय : राजू शेट्टी (व्हिडिओ)

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा व्यापक कटाचा संशय असल्याची जहाल टीका केली.  

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा… Continue reading राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप

मराठी नंबर प्लेटबाबत मनसे आमदार आक्रमक : परिवहन मंत्र्यांना लिहिले पत्र   

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील वाहनांवरील मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल, तर तातडीने त्याबाबत कायदा करुन परवानगी द्यावी आणि महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून केली आहे. महाराष्ट्रात काही वाहनांवर मराठीमध्ये नंबर प्लेट असलेली दिसून येते. मात्र, वाहतूक… Continue reading मराठी नंबर प्लेटबाबत मनसे आमदार आक्रमक : परिवहन मंत्र्यांना लिहिले पत्र   

 राज ठाकरे यांना दुखापत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावले आहे. मनसे अध्यक्ष ठाकरे यांचे कला आणि… Continue reading  राज ठाकरे यांना दुखापत

शेतकरी आंदोलनासंबंधी भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. अशातच कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदाराने शेतकरी आंदोलनावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन फसवे आहे. पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत’, असा दावा भाजप खासदाराकडून करण्यात… Continue reading शेतकरी आंदोलनासंबंधी भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

error: Content is protected !!