कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘झिव्हा’ च्या  वतीने लवकरच मिस व मिसेस महाराष्ट्र या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.  त्यासाठी रविवारी (दि. २४)   कोल्हापुरातील हॉटेल रेडिएंट येथे ऑडिशन घेण्यात येणार आहे. यामधून निवडलेल्या  ७० स्पर्धकांना ग्रुमिंग,  कॅटवॉक, प्रेझेंटेशन, डान्सिंग स्किल व टॅलंट राउंडसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिस महाराष्ट्र स्नेहल सरगर, मिसेस इंडिया तिलोत्तमा देशमुख यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य स्पर्धा तीन दिवस सुरु राहणार आहे. युवती व महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी कोल्हापुरात  या भव्य शोचे आयोजन केले आहे. ज्या युवतीना फॅशन इव्हेंट तसेच मॉडेलिंग व अॅक्टींग या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यांना या स्पर्धेत मिळणारे व्यासपीठ नक्कीच एक चांगली संधी उपलब्ध करून देणार आहे.

या स्पर्धेचा पहिला टप्पा ऑडिशन राउंडने होणार आहे. झिव्हा या प्रतिथयश कंपनीच्या पुढाकाराने कोल्हापुरात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत मुख्य विजेत्यांसह विविध विभागातही आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. शिवाय झिव्हातर्फे विविध मान्यवर कंपन्यांशी टायअप केल्याने विजेत्यांना करिअरच्या अनेक संधी मिळणार आहे.

यावेळी कमिटी मेंबर सिद्धांत देशमुख, सागर पाटील  आदी  उपस्थित होते.