इचलकरंजी नगरपालिकामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न…

0
28

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील एका सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याने आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास  नगरपालिका इमारतीमध्येच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नगरपालिकेत एकच खळबळ उडाली. नारायण लंगोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इचलकरंजी महानगरपालिकामधील फंड,पेन्शन आणि इतर रक्कम वारंवार पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. नारायण लंगोटे यांनी अंगावर पेट्रोल ओतून हातात काडीपेटी घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नगरसेवक आणि नागरिकांनी हातातील काडेपेटी काढून घेऊन लंगोटे यांच्या अंगावर पाणी ओतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी लंगोटे यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.