सीपीआरमध्ये विद्यार्थिनीवर बळजबरीचा प्रयत्न

0
254

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाच्या नर्सिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सीपीआरच्या पुरुष परिचारिकाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारात ओटी विभागात घडली.

घटनेची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांनी दिली. ते सकाळी सोलापूरहून तातडीने कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आणि परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या यांना दिली. ज्यावेळी हा प्रकार घडला. त्यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी संशयिताला चोप दिला. दरम्यान, या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यांनीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर तिथे उपचार सुरु आहे. या प्रकरणी सीपीआर पोलीस चौकीत गुन्हा नोंद झाला आहे.