अनिल परब यांच्या घरावर काळी शाई फेकण्याचा प्रयत्न

0
41

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर आज (मंगळवारी) काळी शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अनिल परबांच्या घरासमोर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आजपासून अनिल परब यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तर याबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याबद्दल काहीही कल्पना नाही. संपात अनेक संघटना आणि लोकप्रतिनिधी सहभागी होत असून त्यामध्ये कोणी आंदोलन केले, याची कल्पना नाही. एसटी कर्मचारी आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करत आहेत. आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांनी अनुचित प्रकार करू नका, असे आवाहनही पडळकर यांनी केले आहे.