पैशाच्या बळावर जागा हडप करण्याचा जीवन आवळेंचा प्रयत्न : एस.एम.गोगटे (व्हिडिओ)

0
63

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथील हॉली इव्हेंजलिस्ट चर्चच्या मालकीच्या पॅरीश हॉलचे काम बेकायदेशीर सुरू आहे. बीडीटीए संस्थेचे प्रॉपटी मॅनेजर जीवन आवळे व आशुतोष डेव्हिड यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. हायकोर्टाची संबंधित कामास स्टे ऑर्डर असताना फक्त राजकीय दबाव आणि पैशाच्या जोरावर जागा हडप करण्याचा जीवन आवळे यांचा प्रयत्न आहे, असा   आरोप चर्चचे अध्यक्ष एस.एम. गोगटे यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत केला.

यासंदर्भात कोर्टात आपील करणार असल्याचेही गोगटे यांनी सांगितले. दरम्यान  पॅरीश हॉलचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलन करत बंद पाडले होते. त्यानंतर हे काम कायदेशीरपणे सुरू केले आहे. शिवसेनेने माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने काम बंद पाडले, असे आरोप जीवन आवळे यांनी केले होते. या आरोपाचे यावेळी ट्रस्टच्यावतीने खंडन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला चर्चचे सेक्रेटरी सतीश कांबळे, खजिनदार संदीप आवळे, ट्रस्टी संजय आवळे उपस्थित होते.