लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार : एकावर गुन्हा

0
79

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पिडीत महिलेने प्रकाश बंडोपंत पाटील रा. आपटेनगर याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत महिला आणि प्रकाश पाटील हे गेल्या तेवीस वर्षांपासून एकमेंकांना ओळखतात. प्रकाश पाटील याने पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शाररिक संबंध ठेवले. यावेळी प्रकाश पाटील याने तिला आपले शाररिक संबंध असल्याची माहिती सर्वांना देतो अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीत महिलेने प्रकाश पाटील याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.