अल्पवयीन मुलीवर अत्याचार : महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांच्या दोन मुलांवर गुन्हा

0
12

सातारा (प्रतिनिधी) : लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला  घरातच जन्म दिल्याची धक्कादायक माहिती महाबळेश्वर परिसरातून समोर आली आहे. या प्रकरणी २ मुख्य आरोपींसह ९ जणांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही समावेश आहे.  त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम,  घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली आहे.   इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पीडित मुलगी महाबळेश्वरमध्ये मोलमजुरी करून राहते . मुख्य आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केले  होते. त्यातून ही मुलगी गर्भवती राहून तिने काही दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. याबाबत, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांनी संबंधित अल्पवयीन मुलगी व कुटुंबियांना विश्वासात घेऊन माहिती घेतली.  त्यानंतर पीडितेने आपबिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.