लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एकावर गुन्हा

0
37

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित तरुणीने अब्दुलरजाक नजरूद्दीन मुल्लानी (रा. कवठेमंहाकाळ, जि. सांगली) त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अब्दुलरजाक मुल्लानी याने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर सांगली, मिरज आणि कोल्हापूर याठिकाणी अत्याचार करून त्याचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. या तरुणीने अब्दुलरजाक मुल्लानी याच्याकडे लग्नाची विचारणा केली केली असता त्याने लग्नाला नकार दिला. तसेच त्या तरुणीला मारहाण करून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर मुल्लानीच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने मुल्लानी याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here