Published August 7, 2023

विशेष ( प्रतिनिधी ) लव बर्डमधील अनेक रंजक किस्से आपण यापुर्वी वाचले अथवा ऐकले असतील. मात्र रायपूर, छत्तीसगढ येथे प्रियकर अन् प्रेयसी यांच्यातील झालेल्या वादातून प्रेयसीने टोकाचं पाऊस उचलल्याने पोलिस प्रशासनासह स्थानिक नागरिकांची पळापळ झाल्याची घटना घडली आहे.


एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रियकरावर नाराज झालेल्या अल्पवयीन प्रेयसीनं टोकाचं पाऊल उचलत ती हायटेंशन टॉवरवर 80 फूट वर चढली. प्रेयसीचा राग दूर करण्यासाठी तिच्या पाठोपाठ प्रियकरही टॉवरवर चढला. त्यांना पाहून लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. याची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना समजावलं.


हा हाय होल्टेज ड्रामा बराचवेळ हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर दोघांची समजूत काढत पोलिसांनी दोघांना ही त्या पोलवरुन खाली उतरवलं अन् या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौरेला पेंड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे गावातील तरुणाशीच प्रेमसंबंध होते.

फोनवर बोलताना दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे नाराज झालेली मुलगी गावातून निघाली आणि हायटेंशन लाईनच्या 80 फूट उंच टॉवरवर चढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेयसी टॉवरवर चढताच प्रियकरदेखील तिच्या पाठोपाठ टॉवरवर चढला. प्रेयसी टॉवरच्या टोकाला पोहोचली. दोघांना टॉवरवर पाहून ग्रामस्थ आणि कुटुंबीय घाबरले. ग्रामस्थ खाली जमलेले दिसत आहेत.

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023