कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील पै. युवराज पाटील कुस्ती क्रिडा संकुल, कुडीत्रे तालीमीचा पै. सिद्धेश पाटील याने सातारा जिल्ह्यांतील मोरगीरी माणगांव येथील कुस्ती मैदानात ५० किलो गटामध्ये प्रथम येऊन चांदीची गदा व रोख रक्कम बक्षीस पटकावले. यावेळी सिद्धेशची गावातून घोडयावरून आणि हालगीच्या वाद्यांत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीला गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रा.पं.सदस्य प्रधान पाटील, वडील पै. दादू पाटील, संभाजी साळोखे, एस.के. पाटील, वस्ताद आकाराम पाटील, रंगराव पाटील, अशोक पाटील, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.