कणेरीवाडी येथे टायर फुटून सिमेंटचा ट्रक पलटला    

0
65

करवीर (प्रतिनिधी) : पुणे– बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी येथे ट्रकचा (एमएच ०९ ईएम ८०४५) उजव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकून जागीच पलटी झाला. ही घटना कणेरीवाडी फाट्याजवळ महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर आज (शुक्रवारी) सकाळी ९.१० वाजता घडली. यात चालक मुजुमिल हवालदार (रा.चिकोडी) हा किरकोळ जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक सिमेंट घेऊन पुण्याकडे चालला होता. ट्रकमधील सिमेंट पोती महामार्गावर पडल्याने काहीकाळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी धाव घेत महामार्ग पोलीस आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी काहीवेळात वाहतूक पूर्ववत केली. ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याने स्वतःच उपचार करून घेतले. सिमेंट पोती दुसऱ्या ट्रकमधून पाठविण्यात आली.