इचलकरंजीत तरुणावर प्राणघातक हल्ला : तरुण गंभीर

0
59

इचलकरंजी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजीमध्ये खून आणि प्राणघातक हल्ल्याचे सत्र सुरू आहे. गावभाग नदीवेस नाका परिसरात जामदार गल्ली येथे काल (शनिवार) रात्रीच्या सुमारास धनंजय नायकोडे (वय ३८, रा. चांदणी चौक) या तरूणावर पूर्व वैमनस्यातून अज्ञातांनी धारदार शस्त्राने  प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात धनंजय हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी हल्लेखोर पसार झाले.

धनंजयवर आयजीएम रूग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी गावभांग पोलीस दाखल झाले होते. रुग्णालयाच्या बाहेर नागरिक आणि नातेवाईकनी गर्दी केली होती. परंतु, अद्याप या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नाही.