व्यंकटेश सूतगिरणीच्या चेअरमनपदी अशोक स्वामी

0
11

हुपरी (प्रतिनिधी) : श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी इचलकरंजी साईट हुपरी-यळगूड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोळ सहकारी संस्थेचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड होते. सभेमध्ये गिरणीच्या चेअरमनपदी अशोक मल्लय्या स्वामी, तर व्हा. चेअरमनपदी नानासो फक्कड गाठ यांची निवड करण्यात आली.

अध्यासी अधिकारी प्रेमदास राठोड यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. संचालक मंडळामध्ये अॅड. अलका स्वामी, दिलीप मुथा, चंद्रकांत वडते, बाबासो कित्तुरे, विश्वनाथ मेंटे, संतोष जानवेकर, अरुण बंडगर, वैशाली कदम व राजश्री सावंत, शेखर खोत, अशोक पाटील, रावसो विठ्ठाण्णा, रवींद्र पाटील, बापूसो मंडले, माणिक पतंगे यांचा निवड झाली आहे.