आजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे येथील अण्णा भाऊ सहकारी सूतगिरणीच्या४३ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी होत्या. 

चराटी म्हणाले, १५६पैकी दोनच सूतगिरण्या सुरु आहेत. त्यामध्ये आजरा सूतगिरणीचा समावेश आहे. शिंदे-फडणवीस सरकार देण्याचा मूडमध्ये आहे. शासन सूतगिरणींचा १० टक्के तोटा भरून देणार असून, राज्य शासनाने मदत केली तर सूतगिरण्या अडचणीतून बाहेर येतील. वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.

यावेळी देवर्डेचे सरपंच जी. एम. पाटील, संदीप देशपांडे, यज्ञेश बुगडे, संभाजी बापट यांचा, तर माधवराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त मंगेश तेऊरवाडकर या कामगाराचा डॉ. अनिल देशपांडे, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. अंजनी देशपांडे, मीलन होळणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरूणकर, डॉ. इंद्रजित देसाई, मनीषा कुरूणकर, सुरेश डांग, मारुती मोरे, दशरथ अमृते, प्रकाश वाटवे, अतिशकुमार देसाई, चीफ अकौटंट विष्णू पोवार राजाराम पोतनीस आदी उपस्थित होते.