कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने मानधन वाढीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची आज (शुक्रवार) प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानण्यात आले.

जिल्हा आशा व गटप्रवर्तकांच्या वाढीव व थकीत मानधनावरून मोठ्या प्रमाणात वादंग झाले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांना मित्तल यांच्याकडून निलंबित करण्यासाठी पत्रे पाठवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनमध्ये मोठा संघर्ष झाला. जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. याची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्वरीत सर्व मागण्यांची पूर्तता करावी असे आदेश दिले. याप्रमाणे जिल्हा आशा व गटप्रवर्तक याना थकीत मानधन मिळाले. याबद्दल जिल्हा आशा व गटप्रवर्तकच्या सचिव उज्ज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखालील युनियनच्या सदस्यांनी सीईओ अमन मित्तल, डॉ. योगेश साळे यांचे भेट घेऊन आभार मानले.

यावेळी चंद्रकांत यादव, खजिनदार संगिता पाटील, ज्योती तावरे, विमल अतिग्रे, संगीता सूर्यवंशी, निशा कांबळे, अमृता भोसले, दीपा माने, प्रेमल कांबळे आदी आशासेविका उपस्थित होत्या.