कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा सेविका तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यांच्या या प्रश्नाबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून आशा सेविकांच्या बाजू त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती जि.प.च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी दिली. त्या गडमुडशिंगी येथे आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या सत्कारावेळी बोलत होत्या.

शौमिका महाडिक म्हणाल्या की, आशा सेविका तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यांच्या या प्रश्नाबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून आशा सेविकांच्या बाजू त्यांच्यासमोर मांडू आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच उपसरपंच तानाजी पाटील, सरपंच अश्विनी शिरगावे, ग्रा. पं. सदस्य संजय सकटे, संगीता गोसावी, आरोग्य सेविका संध्या महाजन, अरविंद शिरगावे यांनी आशा सेविकांच्या समस्या मांडल्या

यावेळी गितेश डकरे, संजय सोनुले, सुरज कांबळे, चंद्रशेखर पाटील, राकेश कुरळे, संतोष शिरगावे, शेखर गोसावी, शुभम लोंढे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यावेळी उपस्थित होते.