नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

0
64

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटना संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज (रविवार) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय झाल्याची माहिती कार्यवाह दादा गोरे यांनी दिली. 

साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे व जनार्दन वाघमारे यांच्या नावांची चर्चा सुरू होती. अखेर डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच खेचाखेची सुरू होती. अखेर नाशिकला हा मान मिळवण्यात यश आले.