दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची महान धावपटू आणि माजी ऑलिम्पिक खेळाडू पी. टी. उषा यांनी ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत इतिहास रचला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) ९५ वर्षांच्या इतिहासात पी. टी. उषा या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होणार आहेत. याशिवाय उषा आयओए प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू असतील. उषा सध्या राज्यसभेच्या खासदारही आहेत.

उषा यांनी आयओएच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दाखल केला आहे. एम. सी. मेरी कोम यांच्या नेतृत्वाखालील आयओएच्या कमिशनणे निवडलेल्या आठ ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ आऊटस्टँडिंग मेरिट’मध्ये उषा यांचा समावेश आहे. अनेक आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या ५८ वर्षीय उषा यांनी आयओए अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे उषा यांची बिनविरोध निवड होणार आहे.