कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील डॉ. अल्पना चौगुले यांनी इतिहासाला धरून अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण अशी जलरंगामध्ये ‘शिवराज्याभिषेक’ रेखाटले. त्यांचा शिवराज्यभिषेकाचे पेटींग काढणारी देशातील पहिली महिला म्हणून त्यांचा तंजावरचे सध्याचे राजे छ. शिवाजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी तेथील सर्व मान्यवरांना शिवराज्याभिषेक पेंटिंगच्या प्रति देऊन सत्कार केला. हे पेंटिंग सध्याचे छ. शिवाजीराजे यांनी आपल्या तंजावर येथील महालामध्ये लावलेले आहे.

तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महलामध्ये छ. राजे सरफोजी दुसरे यांचा २२५ वा राज्याभिषेक साजरा करण्यात आला. त्यावेळी तेथे तामिळनाडू शासनातील अधिकारी अनेक मंत्री, शहाजीराजे आणि  शिवाजीराजे यांचे देशातील अनेक वारसदार व तेथील अनेक मान्यवर उपस्थित होते.  तसेच डॉ. अल्पना चौगुले यांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सत्कार केला आहे. तर केंद्र शासनाने ही त्यांचा ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ या वर्षीचा अवॉर्ड देऊन गौरव केला आहे.

यावेळी डॉ. सुंदर मूर्ति, व्हाईस चेअरमन सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल चेन्नई, तंजावरचे राजे छत्रपती शिवाजी भोसले, कलेक्टर- थिरू एस.एस. पालनीमनीकम, थिरु अनबिल महेश पोया मोझी (युनियन एज्युकेशन मिनिस्टर), नागपूरचे राजे मुधोजी, कळवबिडचे राजे मोहिते, तंजावरचे राजेंचे अनेक वंशज, कोल्हापूरहून डॉ. सोपान चौगुले, अरुण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.