जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प ..! : चंद्रकांत पाटील

0
13

मुंबई (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध! प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत… जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प !, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला आज (बुधवार) दिला.

मनसुख हिरेन खून प्रकरणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी करून काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.  राजकारणाचे गुन्हेगारीकरण…. फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का?  मनसुख हिरेनच्या पत्नीचा सचिन वाझेवर का संशय?, मनसुख हिरेनची हत्या झाल्याचे त्यांच्या पत्नीला का वाटते?, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान,  मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. तर  वाझे यांना निलंबित करून अटक कऱण्याची मागणी विधान  परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  केली आहे.