व्हन्नूरला टायफॉईडची साथ आली तेव्हा आ. मुश्रीफ कोठे होते ? : सौ. अरुंधती घाटगे

0 116

व्हन्नूर (प्रतिनिधी) : गतवर्षी व्हन्नूर गावात टायफॉईडची साथ आली होती तेव्हा आ. हसन मुश्रीफ कोठे होते, असा घणाघाती सवाल गोकुळच्या माजी संचालिका अरुंधती घाटगे यांनी केला. कागल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयबाबा घाटगे यांच्या प्रचारार्थ व्हन्नूर (ता. कागल) येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

गेल्या वर्षी व्हन्नूर गावात टायफॉईडच्या साथीने थैमान घातले. प्राथमिक शाळेचे २०० विद्यार्थी व प्रत्येक घरात एक असे ६०० रुग्ण होते. त्यावेळी ‘महाडॉक्टर’ पदवी लावलेले बोगस डॉक्टर फिरकलेच नाहीत. ग्रामस्थांनी एकजुटीने तब्बल १० लाखाचा खर्च केला. आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात आमदारांनी कोणतीच भरीव कामगिरी केलेली नाही, असा आरोप गावक-यांनी केला.

शाहू साखर कारखाना उभारणीमध्ये संजयबाबांचेही योगदान आहे. ही आमची लढाई अंतिम असून संजयबाबांना निवडून द्या, अशी भावनिक साद सौ. अरुंधती घाटगे यांनी घातली. या वेळी कोणत्याही परिस्थितीत संजयबाबांना आमदार करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी राजू पाटील, बंडा लोहार, एस. आर. निकम, डॉ. मारुती कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More