‘मी जनतेच्या ए-बी फॉर्मवरच निवडणूक लढवतोय ! : अरुण डोंगळे

0 150

तुरंबे (प्रतिनिधी) : मी अपक्ष उमेदवार असलो तरीही सर्वपक्षीय जनतेच्या ए-बी फॉर्मच्या जोरावर निवडणूक लढवत आहे. राधानगरी तालुक्यात एक  औद्योगिक प्रकल्प उभा करून युवकांना रोजगार देणार आहे. मतदारसंघातील शेतीचे प्रश्न सोडविणार आहे. यासाठी मला भरघोस मताचं पाठबळ देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी केले. तुरंबे (ता. राधानगरी) येथे सिद्धिविनायक विनायक मंदिरात प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिध्दिविनायक देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पोवार होते.

मी गेली ३० वर्षे पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र मला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक एक लाख ६६ हजार मतदार असताना देखील पक्षाने व राज्यपातळीवरील नेते मंडळींनी आमच्या तालुक्याला वारंवार उमेदवारी डावलून वंचित ठेवले आहे. राधानगरीचाच आमदार करून आपली ताकद दाखविण्याची हीच वेळ आली आहे. आता नाही तर कधीच नाही.  मागील ३० वर्षे गटतट न पाहता सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गावागावात विविध संस्था स्थापन करून तरुणांना काम देऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवले. तसेच महिलांना विविध स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. याची पोहचपावती म्हणून मला आपला हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भोगावतीचे संचालक विश्वनाथ पाटील, बी.आर.पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, महिला अध्यक्षा मेघा  धनवडे, वसंतराव पाटील सिरसेकर यांनी मनोगत व्यक्त केली. या प्रचार शुभारंभ प्रसंगी भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील, व्ही. डी. पाटील, सदाशिवराव पाटील (कोदवडे), चंद्रकांत चौगले (कुडित्रे), रावण खोत, भास्कर खोत, सर्जेराव कवडे, राजेंद्र चौगले, अभिजित डोंगळे, अभिषेक डोंगळे, संदीप डोंगळे, तानाजी लाड, अर्जुन लाड, आनंदराव पाटील  बळवंतराव चौगले, बाजीराव जाधव, संजय चव्हाण, रामभाऊ पाटील, रवींद्र जाधव, श्रीकांत कुलकर्णी आदी  उपस्थित होते. भोगावतीचे संचालक विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक, प्रतीक घाटगे यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More